महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हिंडलगा ग्रा. पं. क्षेत्रातील विजयनगर भागात जलजीवन योजनेचा शुभारंभ

10:33 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

Advertisement

हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विजयनगर, लक्ष्मीनगर व हिंडलगा  विभागासाठी 24 तास घरोघरी शुद्ध पाणी या योजनेअंतर्गत जलजीवन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. विजयनगर येथील साई मंदिरसमोर शनिवार दि. 16 रोजी हा कार्यक्रम झाला. प्रथम ग्रा. पं. सदस्य विठ्ठल देसाई यांनी स्वागत करून योजनेची माहिती दिली. कर्नाटक काँग्रेस युवा अध्यक्ष मृणाल हेबाळकर यांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रकाश पाटील यांनी केले. या योजनेचा शुभारंभ मृणाल हेबाळकर यांच्या हस्ते कुदळ मारून व फलक अनावरण करून करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रा. पं. उपाध्यक्षा चेतना अगसगेकर, राहुल उरणकर, गजानन बांदेकर, रेणुका भातकांडे, सीमा देवकर, अशोक कांबळे, डी. बी. पाटील, निखिल रजपूत, अलका कित्तुर, प्रेरणा मिरजकर, पंचायत विकास अधिकारी बसवंत कडेमनी, अभियंता मेहबूब अलिम व ग्रामस्थ उपस्थित होते. या योजनेसाठी 13 कोटी निधी बेळगाव ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला आहे. हिंडलगा व लक्ष्मीनगर भागातही याचा शुभारंभ केला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article