For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विलवडे ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा गाडीचा शुभारंभ

05:30 PM Oct 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
विलवडे ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा गाडीचा शुभारंभ
Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

Advertisement

स्वच्छता भारत मिशन ग्रामीण अंतर्गत "स्वच्छता हीच सेवा मोहीम" यशस्वी करण्यासाठी विलवडे ग्रामपंचायतीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांतर्गत गावातील कचरा व्यवस्थापनासाठी या ग्रामपंचायतीने कचरा गाडी खरेदी केली असून याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी सरपंच प्रकाश दळवी यांनी स्वच्छता अभियानाबाबत उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच स्वच्छता मोहीम अंतर्गत विलवडे ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी माजी उपसभापती तथा विलवडे तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णा सावंत यांचा सत्कार करून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी विलवडे सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी,तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णा गुणाजी सावंत, तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष नंदकिशोर दळवी, ग्रामपंचायत सदस्य सौ. शिल्पा धर्णे, सोनू दळवी, परेश धर्णे, योगेश दळवी, ग्रामसेवक विलवडे आरती चव्हाण, तलाठी श्रीम. सोनवलकर, पोलीस पाटील पांडुरंग कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी ममता कोनसकर, जयप्रकाश दळवी, तेजल देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.