For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरिहंत हॉस्पिटलमध्ये फायब्रोस्कॅन मशीनचे उद्घाटन

11:15 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरिहंत हॉस्पिटलमध्ये फायब्रोस्कॅन मशीनचे उद्घाटन
Advertisement

बेळगाव : अरिहंत हॉस्पिटलने रुग्णसेवा हीच भावना समोर ठेऊन वाटचाल केली आहे. रुग्णांना उत्तम सेवा मिळावी या हेतूने नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. आता यकृतविषयी रोगाचे निदान करून योग्य उपचार देण्याच्या हेतूने फायब्रोस्कॅनच्या मशीनच्या माध्यमातून हॉस्पिटलने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे, असे मत रोटे. शरद पै यांनी व्यक्त केले. शहरातील अरिहंत हॉस्पिटलमध्ये नूतन फायब्रोस्कॅन मशीनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. एम. डी. दीक्षित होते. शरद पै म्हणाले, आजकाल गतिमान जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे पोटाचे विकार वाढले आहेत. मात्र, अरिहंतने नवीन मशीन आणल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. लठ्ठपणा, फॅटीलिव्हर, हेपेटायटीस बी व आनुवंशिक आणि चयापचय विकारांसह यकृत फायब्रोसीस निर्माण होतो. सुरुवातीला यकृत सामान्य असते. परंतु दुर्लक्ष केल्यास फॅटीलिव्हर, फायब्रोसीस व यकृताच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते. आता या मशीनमुळे रुग्णांना आम्ही सर्वोत्कृष्ट उपचार देऊ शकतो, असे गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट डॉ. वरदराज गोकाक यांनी सांगितले. हॉस्पिटलचे चेअरमन सहकाररत्न रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी हॉस्पिटलच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. किशोर भट्ट, डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. गणेश कोप्पद, डॉ. सूरज पाटील, डॉ. संजीव आर., डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. प्रतिक इट्टी, मल्लेश य•ाr यासह परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.