सातारा आगारात ई-बसेसचे उद्घाटन
सातारा
राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा आगारात ई-बसेसचे उद्घाटन मा.ना.श्री. शंभुराज देसाई, मंत्री उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास श्री. रोहन पलंगे, विभाग नियंत्रक,सातारा विभाग., विकास माने.यंत्र अभियंता (चा).,ज्योती गायकवाड, विभागीय वाहतूक अधिकारी. ,रत्नकांत शिंदे, आगार व्यवस्थापक (वरिष्ट),सातारा आगार.,तेजस नवले, लेखा अधिकारी., इंगवले प्रादेशिक अभियंता (विद्युत).,दत्ताजीराव मोरे, कर्मचारी वर्ग अधीकारी.,आदेश माने, सांखिकी अधिकारी., रेश्मा गाडेकर, विभागीय वाहतूक अधीक्षक.,गायकवाड ,भांडार अधिकारी.सुर्यवंशी,उपयंत्र अभीयंता उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात ९मिटर सेवा प्रकारातील 34आसन क्षमता असलेल्या वातानुकूलित ५ ई-बसेस सातारा -स्वारगेट (विना वाहक विना थांबा) मार्गावर प्रवाशी सेवेकरीता दि.२४/०८/२०२४ पासुन सुरु करण्यात आल्या आहेत.सदरच्या ई -बसेसचा प्रवास सुखकर व आरामदायी असणार आहे.सदरच्या ई-बस सेवेचा लाभ प्रवाशानी घ्यावा असे आवाहन श्री रोहन पलंगे,विभाग नियंत्रक,रा.प. सातारा विभाग यांनी केले.
सदर उद्घाटन कार्यक्रमास सातार-स्वारगेट विनावाहक मार्गाचे प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी श्री.गायकवाड, श्री.बाचल व श्री.चिकणे उपस्थित होते. मा.पालक मंत्री महोदयांनी ई-बस बाबत कंपनी प्रती निधी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली.तसेच मा.पालक मंत्री महोदयांनी एसटी महामंडळाचे अधिकारी, कंपनी प्रतीनिधी यांचे समवेत ई-बस मधुन थोडीशी सफर केली व सदर ई-बस आरामदायी व सुखकर प्रवासा करीता उत्कृष्ट असले बाबत समाधान व्यक्त केले.