For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुका कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन

11:12 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुका कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन
Advertisement

उत्तर, दक्षिण विभागात सहा केंद्रे उभारणार

Advertisement

बेळगाव : सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून तो जमा करण्यासाठी विविध ठिकाणी संकलन केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. उत्तर आणि दक्षिण विभागामध्ये एकूण 6 संकलन केंद्रे होणार आहेत. अशोकनगर येथे संकलन केंद्राची इमारत पूर्ण झाली असून त्याचे उद्घाटन मंगळवारी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सुका कचरा जमा केल्यानंतर त्यामधील कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. प्लास्टिक हे सिमेंट कारखाना किंवा डांबरी रस्त्याला वापरण्यासाठी पाठविण्यात येत आहे. इतर कचराही त्याचप्रकारे वर्गीकरण करून विविध विभागांना पाठविला जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेला खर्च करण्याऐवजी त्यामधून काही रक्कम मिळत आहे. सुका कचरा जमा केल्यानंतर कर्मचारी वेगवेगळा करत आहेत. चप्पल, बुट व इतर प्लास्टिक साहित्याचे वर्गीकरण केले जाते. कचरा नेण्यासाठी स्वत:ची वाहने घेऊन संबंधित कारखानदार येत असतात. त्यांना तो कचरा दिला जातो. त्यामुळे महानगरपालिकेवरील ताण कमी होत आहे. मंगळवारी नगरसेवक बाबाजान मतवाले, पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी, आदिलखान पठाण यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.