महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देवसू आयुष्यमान आरोग्य मंदिरचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

04:55 PM Aug 08, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

देवसू गावातील आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत इमारत या दोन्हींचे भूमिपूजन आपण केले असून पूर्ण झालेल्या आरोग्य केंद्राचे आज उद्घाटन सुद्धा मीच केले आहे तसेच ग्रामपंचायत इमारतीसाठी लागणारा अतिरिक्त निधी सुद्धा आपण उपलब्ध करून देईन असे आश्वासन यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले . महाराष्ट्र शासन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत "आयुष्यमान आरोग्य मंदिर" या इमारतीचे उद्घाटन आज शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या हस्ते देवसू येथे करण्यात आले. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत देवसू उपकेंद्राची इमारत या ठिकाणी शासकीय नीधीतून उभारण्यात आली असून देवसू पारपोली ,ओवळीये या तीन गावातील सुमारे अडीच हजार लोकवस्तीला या उपकेंद्राचा लाभ होणार आहे. यावेळी दीपक भाई केसरकर यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आणखी मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून एक रुग्णवाहिका या पंचक्रोशीसाठी देण्याचे कबूल केले. देवसू गावातील आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत इमारत या दोन्हींचे भूमिपूजन आपण केले असून पूर्ण झालेल्या आरोग्य केंद्राचे आज उद्घाटन सुद्धा मीच केले आहे तसेच ग्रामपंचायत इमारतीसाठी लागणारा अतिरिक्त निधी सुद्धा उपलब्ध करून देईन असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. या उपकेंद्रासाठी ज्यांनी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली असे बाबू पायबा सावंत, प्रकाश अनंत सावंत व या आरोग्य केंद्रासाठी शासकीय कार्यालयात वेळोवेळी पाठपुरावा केला असे मुंबई स्थित ग्रामस्थ शामसुंदर आत्माराम सावंत यांच्या सत्कार यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी नारायण राणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी व त्यांचे कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर व त्यांचे सर्व कर्मचारी देवसू उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जीवन चव्हाण आरोग्य सेवक साई मोकाशी व इतर कर्मचारी, पारपोली ओवळीये व देवसू गावातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका,पारपोली सरपंच लक्ष्मण नाईक उपसरपंच संदेश गुरव सातुळी बावळाट सरपंच सौ सोनाली देविदास परब , देवसू ग्रामपंचायत सदस्य सौ उर्मिला लक्ष्मण सावंत, दिनेश गावडे डॉ .लवू सावंत, हनुमंत सावंत, तारकेश सावंत, सुमेध सावंत, विठ्ठल सावंत, दिनेश सावंत,सुरेंद्र देसाई तुकाराम सावंत, अनंत सावंत, प्रकाश सावंत, धर्मेंद्र सावंत,समीर शिंदे ,गोविंद सावंत, जयवंत सावंत, प्रवीण सावंत, आत्माराम सावंत, दिगंबर सावंत, राजेश सावंत, ज्येष्ठ नागरिक सोमा तुकाराम सावंत , माझी पोलीस पाटील जनार्दन जाधव, बापूराव देऊसकर राजेश जाधव तसेच पारपोली ओवळीये व देवसू गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news update # deepak kesrakar # devsu #
Next Article