महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

असनियेत केसरकरांच्या माध्यमातून २० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

05:25 PM Dec 31, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
असनिये येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून २० लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी असनिये गावच्या विकासासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून यापुढेही भरघोस निधी देऊन या गावचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार असल्याची ग्वाही असनियेवासियांना दिली.

Advertisement

या विकास कामांमध्ये श्री देवी माऊली मंदिर ते पांडुरंग मेस्त्री यांचा घरापर्यंत जाणारा रस्ता ७ लाख, बाळा सोमा सावंत ते टेपवाडी जाणारां रस्ता ८ लाख, श्री देवी माऊली मंदिर नजिक कॉजवे बांधणे ५ लाख या कामांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विकास कामांचा शुभारंभ झाल्याने असनियेवासियांनी समाधान व्यक्त केले.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनायक दळवी, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, सरपंच सौ रेश्मा रमेश सावंत, पपू सावंत, ग्रामचायत सदस्य दर्शना दामले, भरत सावंत, शिवसेना शाखाप्रमुख राकेश सावंत, विद्या सावंत, लक्ष्मण,सावंत, जितेद्र सावंत, प्रितेश ठिकार, संदेश कोलते, सभाजी कोलते, बाबल सावंत, रुपेश सावंत, सतीश सावंत, विकास सावंत, वैभव सावंत, कृष्णा सावंत, ओमकार सावंत, रोहित सावंत, सुभाष सावंत, तुकाराम सावंत, प्रशांत ठिकर, नरेंद्र नाईक, बाबुराव सावंत, आनंद ठीकार, प्रेमानंद ठिकार, दुलाजी सावंत, भिकाजी नाईक, सोहम सावंत, शैलेश सावंत, गणपत सावंत, रत्नाकर सावंत आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Advertisement

Advertisement
Tags :
# traun bharat news# asniye
Next Article