For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यल्लम्मा डोंगरावर प्रसाद योजने अंतर्गत विकासकामांचा शुभारंभ

10:42 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
यल्लम्मा डोंगरावर प्रसाद योजने अंतर्गत विकासकामांचा शुभारंभ
Advertisement

खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

बाळेकुंद्री : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यल्लम्मा देवस्थान विकासासाठी प्रसाद योजने अंतर्गत 11 कोटी रुपयांचे अनुदान दिले असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया खासदार मंगला अंगडी यांनी केले.गुरुवार दि. 7 रोजी सकाळी 10.30 वाजता यल्लम्मा डोंगरावर आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्च्युअल (ऑनलाईन) मार्फत उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या अनुदानातून डोंगरावर सामुदायिक शौचालये व स्नानगृहे बांधणे, संरक्षण भिंत बांधणे, विश्रामगृह बांधणे, भाविकांसाठी माहिती केंद्र बांधणे, प्रथमोपचार केंद्राचे बांधकाम, जनावरांसाठी प्रथमोपचार केंद्राचे बांधकाम व पॅन्टीनचे बांधकाम व इतर कामांसाठी सदर निधीचा वापर करण्यात येणार आहे. प्रसाद योजने अंतर्गत देशभरातील प्राचीन मंदिरांना 6,400 कोटी अनुदान देण्यात आल्याचे सांगितले. सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य म्हणाले की, यल्लम्मा देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी यल्लम्मा देवस्थान विकास प्राधिकरणाची स्थापना केली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पर्यटनमंत्री एच. के. पाटील यांनीही मंदिराच्या विकासाठी अनुदान मंजूर केले आहे. आता केंद्र सरकारनेही अनुदान मंजूर केल्याने डोंगराच्या विकासासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी यल्लम्मा देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसय्या हिरेमठ, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, देवस्थानचे सीईओ एसबीपी महेश, रत्ना मामनी, वाय. वाय. काळप्पनावर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.