For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधानांच्या हस्ते क्रिकेट अकादमींचे उद्घाटन

06:23 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधानांच्या हस्ते क्रिकेट अकादमींचे उद्घाटन
Advertisement

बीसीसीआय इनडोअर क्रिकेट अकादमींचे व्हर्च्युअल उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोबत मान्यवर.

Advertisement

वृत्तसंस्था, गंगटोक (सिक्कीम)

बीसीसीआयच्या ईशान्य भारतातील पहिल्या इनडोअर क्रिकेट अकादमींचे व्हर्च्युअल उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. सिक्कीममधील रंगपो येथे सिक्कीम क्रिकेट स्टेडियमच्या परिसरात नव्याने या इनडोअर क्रिकेट अकादमीची सुरुवात करण्यात आली आहे. या विभागात एकूण सहा अकादमींची सुरुवात करण्यात आली आहे.

Advertisement

देशातील विविध भागात क्रिकेटच्या विस्तारीकरणासाठी बीसीसीआयचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये बीसीसीआयने पहिल्याच इनडोअर क्रिकेट अकादमीची स्थापना केली आहे. सिक्कीमच्या या इनडोअर क्रिकेट अकादमीच्या उद्घाटन समारंभाला आयसीसीचे चेअरमन तसेच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जय शहा, बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष मिथुन मनहास, सचिव देवजित सायकीया, उपाध्यक्ष राजू शुक्ला, संयुक्त सचिव प्रभतेज भाटीया, खजिनदार रघुराम भट्ट, आयपीएल चेअरमन अरुणसिंग धुमल आदी मान्यवर उपस्थित होते.

ईशान्य भारतामध्ये क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी उच्चस्तरीय प्रशिक्षणाची संधी बीसीसीआयकडून उपलब्ध करुन देण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सिक्कीम क्रिकेट मैदानावर या इनडोअर क्रिकेट अकादमीची इमारत बांधण्यात आली असून या ठिकाणी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या नव्या इनडोअर क्रिकेट अकादमीसाठी बीसीसीआयने 23 कोटी रुपये खर्च केले आहेत. सिक्कीम क्रिकेट संघटनेतर्फे या इनडोअर अकादमीत नवोदित क्रिकेटपटूंना मार्गदर्शन मिळणार आहे. या क्रिकेट अकादमीमध्ये जीम तसेच जलतरण तलाव यांची सोय करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.