महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेट्टी डायमंड दागिन्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

11:19 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रदर्शन 7 ऑक्टोबरपर्यंत सर्वांसाठी खुले

Advertisement

बेळगाव : दसरा, दिवाळीचे औचित्य साधून युके-27 द फर्नच्या सभागृहात सी. कृष्णय्या चेट्टी ग्रुप ऑफ ज्वेलर्सतर्फे भरवण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या व डायमंड दागिन्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शन दि. 7 ऑक्टोबरपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट डिझाईनसह नीलमणी, सिट्रीन, मोती, एमेथिस्ट, माणिक यासारख्या दुर्मीळ रत्नांसह उत्कृष्ट हिरे आहेत. टेम्पल ज्युवेलरीचे प्रत्यंतर देणारे नेकलेस, रुद्राक्षाचा वापर करून केलेले हार याशिवाय मंगळसूत्र, बांगड्या, तोडे, ब्रेसलेट, कर्णफुले, अंगठ्या यासह अनेक विविध दागिन्यांचा प्रदर्शनामध्ये समावेश आहे.

Advertisement

तरुण पिढीची डायमंड किंवा कमी वजनाच्या दागिन्यांना पसंती

या दागिन्यांमध्ये परंपरा आणि नवता या दोन्हीचा संगम आढळतो. मुख्य म्हणजे तरुण पिढी डायमंड किंवा कमी वजनाच्या दागिन्यांना पसंती देते, हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठीसुद्धा येथे दागिने उपलब्ध आहेत. 599 रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत येथे दागिने पहायला मिळतात. येथील दागिन्यातील प्रत्येक हिरा आणि त्याचे दागिने हे कारागिरांच्या कौशल्याचे प्रदर्शने घडवते. 22 कॅरेट व 18 कॅरेटचे दागिनेसुद्धा येथे पहायला मिळतात. प्रदर्शनाच्या निमित्ताने सोन्याच्या दागिन्यांवर 4 टक्के, चांदीच्या दागिन्यांवर 2 टक्के, डायमंडवर 6 टक्के यासह अन्य सवलती आहेत. कल्पकता, सर्जनशीलता व उत्कृष्ट चित्राकृती यांचा मिलाफ असणारे हे दागिने आवर्जून पहावेत असेच आहेत. माजी खासदार मंगला अंगडी यांनी दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी मार्केटिंग व प्रमुख तेजस कालरा तसेच निशांत व संतोष आदी उपस्थित  होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article