For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत केंद्रस्तरीय शालेय बालकला क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

05:09 PM Dec 12, 2023 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीत  केंद्रस्तरीय शालेय बालकला क्रीडा स्पर्धेचे उदघाटन
Advertisement

माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते उदघाटन

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

सावंतवाडी केंद्रस्तरीय शालेय बालकलाक्रीडा ,ज्ञानी मी होणार स्पर्धेचे उदघाटन मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मा. नगरसेविका दिपाली भालेकर म्हणाल्या कि, शालेय अभ्यासाबरोबर मैदानी खेळही खेळले पाहिजेत व यातूनच देशाचा भावी खेळाडू तयार होईल व भविष्यात देशाचे नाव रोशन करेल. तसेच त्यांनी शिक्षकांचे कौतुक करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

Advertisement

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक भरत गावडे सर यांनीही या क्रीडास्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर व केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.

यावेळी मा. नगरसेविका दिपाली भालेकर, माजी मुख्याध्यापक भरत गावडे सर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर सर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, संतोष तळवणेकर, अजित सावंत, भंडारे मॅडम, श्री कित्तूर, कळसुळकर चे प्राथमिक मुख्याध्यापक प्रदिप सावंत, श्री पोवार सर, सौ सायली लांबर, सौ सावंत मॅडम, श्रीमती मीरा मुद्राळे, श्री धोंडी वरक, सौ संध्या बिंबवणेकर, सौ प्राची ढवळ, सौ दिप्ती सोनवणे इत्यादी मान्यवर सर्व शाळांच्या शिक्षक शिक्षिका पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.