For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडोली येथे बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन

06:01 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
कडोली येथे बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन
Advertisement

वार्ताहर/ कडोली

Advertisement

येथील स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित भव्य बैलगाडी शर्यतीचा शुभारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात झाला. रविवारी शर्यतीची खरी रंगत पहावयास मिळणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील होते.

युवा काँग्रेस नेता राहुल सतीशअण्णा जारकीहोळी, के.पी.सी.सी. सदस्य मलगौडा पाटील आणि कडोली ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने शर्यतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात झाला. प्रारंभी डॉ. विनोद पाटील यांनी प्रास्ताविक उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी गणेश फोटो पूजन ग्रा. पं. सदस्य राजू मायाण्णा आणि सुनिल पावणोजी, जिजामाता प्रतिमा पूजन ग्रा. पं. उपाध्यक्षा दिपा दिपक मरगाळे, डॉ. प्रतिमा विनोद पाटील आणि प्रभा भाऊ पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन ग्रा. पं. सदस्य गौडाप्पा पाटील आणि प्रगतशील शेतकरी मल्लु चौगुले यांच्या हस्ते, हनुमान प्रतिमेचे पूजन आनंद शट्टू चौगुले यांच्या हस्ते तर के.पी.सी.सी. सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि जि. पं. माजी उपाध्यक्ष अरुण्ण कटांबळे यांच्या हस्ते फज्जाचे पूजन करून फीत कापण्यात आला.

Advertisement

यावेळी ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते गाडा पूजन तर सदस्य राजू कुट्रे आणि शंकर चिंचणगी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. त्यानंतर बैलगाडी शर्यतीला सुरुवात करण्यात आली. रविवारी शर्यतीत मोठ्या संख्येने बैलजोड्या सहभागी होणार असल्याने सर्वांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.