For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

एम.व्ही.हेरवाडकर शाळेत प्रदर्शनाचे उद्घाटन

06:22 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
एम व्ही हेरवाडकर शाळेत प्रदर्शनाचे उद्घाटन
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

एम. व्ही. हेरवाडकर प्रायमरी स्कूल, भाग्यनगर, टिळकवाडी येथे विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, कला, संगणक, इंग्रजी, कन्नड, हिंदी इत्यादी भाषा, वस्तू मॉडेल विषयांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात वेगवेगळ्या विभागातून 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोनल सौदागर, प्राचार्या शोभा कुलकर्णी, ज्योती पाटील, गीता पोतदार, शामला जांबोटकर, शिवानी कारेकर, सपना घोरपडे इत्यादी मान्यवर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सोनल सौदागर यांनी विविध विषयांची माहिती करून दिली.

Advertisement

या प्रदर्शनामध्ये विविध छायाचित्रे, फलक, स्क्रीप्ट, स्लाईड शो, शुद्धलेखन, हस्ताक्षर मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे महत्त्व अश्विनी लोहार यांनी सांगितले. प्रभावती पाटील यांनी ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री रानडे यांनी केले. लक्ष्मी बेळवी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उर्मिला पावशे, सपना घोरपडे, प्राचार्या शोभा कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

.