For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सिद्धायतन’ होस्टेल इमारतीचा उद्घाटन सोहळा

12:27 PM Dec 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘सिद्धायतन’ होस्टेल इमारतीचा उद्घाटन सोहळा
Advertisement

बंबरगे-भ़ुतरामहट्टी येथे होस्टेलची इमारत : शाळेत जैन धर्माच्या संस्कारांबरोबरच उत्तम शिक्षणाची सोय : 21 एकर परिसरात शाळा-हॉस्टेल 

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याने जैन धर्माला अनेक मुनी व स्वामी दिले. या जिल्ह्याने धार्मिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. जैन युवक मंडळाने गावच्या बाहेर प्रशस्त जागा घेऊन येथे शाळा व होस्टेल उभारले आहे. या शाळेत जैन धर्माच्या संस्कारांबरोबरच उत्तम शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे ही स्वागतार्ह बाब आहे, असे विचार धर्मस्थळचे डॉ. सुरेंद्र हेगडे यांनी व्यक्त केले. जैन युवक मंडळाने बंबरगे-भ़ुतरामहट्टी येथे उभारलेल्या ‘सिद्धायतन’ होस्टेलच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा बुधवारी सायंकाळी झाला. त्याप्रसंगी डॉ. सुरेंद्र हेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. वीरेंद्र हेगडे अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांचे बंधू डॉ. सुरेंद्र हेगडे यांच्या हस्ते फीत सोडून आणि दीपप्रज्वलन करून भगवान महावीर सिद्धायतन होस्टेल इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. 1894 साली भारतात आलेल्या जर्मन लोकांनी असे सांगितले होते की, तुम्ही गावाबाहेर जागा घ्या, उद्या गावच तुमच्याकडे येईल. हे लक्षात घेऊन जैन युवक मंडळाने ही गावाबाहेर जागा घेतली आणि आज त्या जागेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असेही सुरेंद्र म्हणाले.

Advertisement

कार्यक्रमाची सुऊवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली. जैन युवक मंडळाच्या विश्वस्तांच्या हस्ते व्यासपीठावरील पाहुण्यांना शाल, हार, फेटा व स्मृतिचिन्ह भेट देऊन सन्मानित केले. विद्यार्थ्यांनी नमोकार मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुऊवात केली. 21 एकर जागेत उभारण्यात आलेल्या शाळेच्या परिसरात हे हॉस्टेल बांधण्यात येत आहे. त्याचा तळ मजला आज सुरू करण्यात आला. या मजल्यासाठी मुंबईच्या एल. डी. शाह परिवाराने भरीव देणगी दिली असून त्यांचे नाव या मजल्याला दिले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर सुरेंद्र हेगडे यांच्या हस्ते विनोद दोड्डण्णवर व राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष धन्यकुमार गुंडे यांच्या हस्ते गोपाल जिनगौडा यांचा डॉक्टरेटबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. विनोद दोड्डणावर यांनी आज सोशल मीडियामुळे तऊण पिढी धर्म सोडून बाकीच्या गोष्टी करीत आहे. अशा वेळी जैन युवक मंडळाने येथील विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देऊन धर्मरक्षणाचे कार्य सुरू केले आहे. अशा शिक्षणाची आता खरी गरज आहे, असे मत व्यक्त केले. जैन युवक मंडळाच्या कार्याचा गौरव करून गोपाल जिनगौडा यांनी जैन युवक मंडळाने महिलांसाठीही हॉस्टेल सुरू करावे, त्याला आम्ही योग्य ते सहकार्य करू, असे आश्वासन दिले. बेल्जियमहून आलेल्या राजीव राख्यां या देणगीदारांनीही आपले विचार व्यक्त केले. राज्य काँग्रेसचे जनरल सेव्रेटरी सुनील हणमन्नावर यांनी दोन खोल्या आपल्या कुटुंबाच्यावतीने बांधून देण्याची व सरकारकडून 50 लाख ते एक कोटी ऊपये अनुदान मिळवून देण्याची घोषणा केली.

माजी आमदार संजय पाटील यांनी युवक मंडळाच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला. बेळगावात आम्ही अनेक जैन लोक शिक्षण संस्था चालवितो , पण जैन युवक मंडळाच्या या संस्थेत शिक्षणाबरोबरच संस्कार देण्याचे अतिशय चांगले कार्य सुरू आहे ही आनंदाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमास मुंबईचे देणगीदार एल. डी. शाह व शशांक शाह, अंकलीचे डॉ. एन. ए. मगदूम, संकोनट्टीचे देणगीदार महावीर पडनद, जैन युवक मंडळाचे मॅनेजिंग ट्रस्टी भूषण मिरजी, फाउंडर ट्रस्टी राम कस्तुरी यांच्यासह दीपक लेंगडे, रमेश चिवटे, वृषभ दोड्डणावर, उदय कोल्हापुरे, सुधीर पाटील, सुहास मोहिरे, सुहास हुलबत्ते, सचिन पत्रावळी, दीपक धडोती, नेमेश सुजी, श्रीधर पत्रावळी व सुधर्म मुडलगी आदी ट्रस्टीज उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.