कोलगावात संत शिरोमणी गोरा कुंभार मंदिर सभागृह उद्घाटन व कलशारोहण सोहळा
आज विविध कार्यक्रमांचे आयोजन
ओटवणे | प्रतिनिधी
कोलगाव कुंभारवाडी येथील संत शिरोमणी गोरा कुंभार मंदिराच्या नूतन सभागृहाचा उद्घाटन व कलशारोहण सोहळा शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता प्राकार शुद्धीकरण आणि नवग्रह होमाचा प्रकार, सकाळी ११ वाजता कलशारोहण सोहळा, दुपारी १२ वाजता आरती आणि तीर्थ प्रसाद, रात्री ८ वाजता सभागृहाचा उद्घाटन सोहळा, रात्री ९ वाजता वृंदावन संगीत साधना ग्रुप (पिंगुळी) यांचा अभंग भक्तीगीत व नाट्यगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. याला संगीत तज्ञ तथा गायक. कु वैष्णवी अनिल युरी, तबला वादक कु. साई नाईक, पखवाज विशारद कु. विशाल कोंडुरकर, अनिल धुरी (हार्मोनियम) संगीतसाथ यांची आहे.या कार्यक्रमाला कोकण विभाग कुंभार सामाजिक संस्था अध्यक्ष प्रकाश साळवी, उपाध्यक्ष यशवंत शेदुलकर, प्रसिद्धी उपाध्यक्ष दिलीप हिंदळेकर, संपर्कप्रमुख अँड गणपत शिरोडकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सरचिटणीस विलास गुडेकर, कुंभार संघटना अध्यक्ष नारायण साळवी, तालुकाध्यक्ष एकनाथ कुंभार, महिला अध्यक्ष माधवी भोगण, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, उद्योजक शैलेश पै, प्रकाश सावंत, प्रसिद्धी प्रमुख विष्णू माणगावकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप गवस, पुनम उगवेकर, देवस्थान मानकरी चंदन धुरी, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत गोरा कुंभार सेवा मंडळाचे अध्यक्ष गणेश हरमलकर आणि कोलगाव कुंभारवाडी ग्रामस्थांनी केले आहे.