महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निलेश राणेंच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे खा. नारायण राणेंच्या हस्ते उदघाटन

02:52 PM Nov 06, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण | प्रतिनिधी

Advertisement

कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन मालवण शहरातील मेढा दैवज्ञ भवन नजीक येथे माजी केंद्रीय मंत्री, खा. नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आर पी आय (आठवले गट) महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

यावेळी खा. नारायण राणे म्हणाले या कार्यालयाची विजयाची ख्याती आहे. या निवडणुकीतही ति दिसून येईल. प्रत्येक बूथवर मोठी आघाडी असेल. महायुतीचे उमेदवार निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला. तर येथील आमदार दहा वर्षात निष्क्रिय ठरला असे सांगत खा. नारायण राणे यांनी येथील समस्यांना पाढा वाचला.यावेळी निलेश राणे म्हणाले महायुती जोमाने काम करत आहे. ही ताकद मोठा विजय निश्चित करणारी आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन केले. मोठया विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, रणजित देसाई, शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, किसन मांजरेकर, ऋत्विक सामंत, प्रितम गावडे, महिला उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, भाजपा शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर, राजन गांवकर, आबा हडकर, अभय कदम, शिवसेना शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, पेडणेकर, राकेश सावंत, अमित गावंडे, महेश गांवकर यांसह भाजपा महायुती पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # konkan update # news update # marathi news
Next Article