For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायदानाचा तराजू कोणाच्या बाजूने झुकणार ?

04:04 PM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्यायदानाचा तराजू कोणाच्या बाजूने झुकणार
Advertisement

उच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे मतदारांसह सर्वांचेच लक्ष

Advertisement

पणजी : फोंडा पोटनिवडणुकीसाठी मतदान अवघ्या चार दिवसांवर ठेपले असताना अनिश्चिततेची टांगती तलवारही या निवडणुकीवर आहे. न्यायदानाचा तराजू नेमका कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नियोजित दिनी म्हणजे 9 रोजी निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान होणार, याबाबत राज्य सरकार ठाम असले तरी विरोधक फोंडा पोटनिवडणूक रद्द होणार असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. भाजप-काँग्रेस-आप अशा तिरंगी लढतीत सध्या उच्च न्यायालयाने चौथा कोन म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोणाच्या ध्यानीमनी नसताना फोंडा पोटनिवडणुकीचे भवितव्य पर्वरीच्या खंडपीठाच्या कोर्टरूममध्ये ठरणार आहे.

गीतेशच्या मागे शुक्लकाष्ट

Advertisement

जनमानसाच्या कानोशावरून भाजपचे रितेश नाईक आणि काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर यांच्यातच अटीतटीची लढत होण्याची अपेक्षा आहे. त्यात ‘आप’चे उमेदवार गीतेश नाईक यांच्यामागे शुक्लकाष्ट लागले आहे. उमेदवारी अर्ज भरताना एफआयआर प्रकरणाची माहिती उघड न केल्याबद्दल त्यांच्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यातून सहीसलामत सुटले म्हणत असतानाच, पोटनिवडणुकीतील तीनपैकी सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या गीतेश नाईक यांच्याविऊद्ध 5 लाख ऊपयांच्या कथित चेक बाऊन्सप्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंटचा बॉम्ब फुटला. त्यातून मेरशी न्यायालयाने गीतेश यांना अंतरिम दिलासा दिला असला तरी पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या  पूर्वसंध्येला (8 एप्रिल रोजी ) होणाऱ्या पुढील सुनावणीला काय वाढून ठेवले, याची धाकधूकही लागून राहिली आहे.

Advertisement
Tags :

.