For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांबरा येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांना प्रारंभ

11:08 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांबरा येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांना प्रारंभ
Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

सांबरा येथे दि. 14 मे पासून सुरू होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये विविध विकासकामे जोरात सुरू आहेत. येथील मेन रोडपासून ते माऊती गल्लीतील पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. तसेच गावातील शेऊळ मार्गाच्या डांबरीकरणाचे कामही प्रगतीपथावर आहे व गावातील काही रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. या कामासाठी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. बुधवारी माऊती गल्लीतील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत ही विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून सर्व कामे पूर्णत्वास आली आहेत. गावांमध्ये ज्या ज्या ठिकाणी गटारी नव्हत्या तिथे गटार बांधकामाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ज्या रस्त्यावरून रथाची मिरवणूक निघणार आहे तेथील सिडीवर्क पूर्ण करून घेण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील देवीच्या गदगेच्या ठिकाणी सुशोभिकरणाचे काम ग्रामपंचायतीने पूर्ण केले आहे. काही ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. व गरजेच्या ठिकाणी पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. गावामध्ये दोन ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आले आहेत. यात्रा काळात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून काही ठिकाणी कूपनलिकांची खोदाई करण्यात आली आहे व यात्रा काळात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. त्यासह विविध कामे ग्रामपंचायतीने हाती घेतली असल्याची माहिती ग्रामपंचायत अध्यक्षा रचना राहुल गावडे यांनी दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.