महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विश्वचषक स्पर्धेत बलाढ्या संघ तोंडघशी पडले.!

06:25 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हा जेव्हा लेख वाचत असाल त्यावेळी तुम्हाला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकातील विजेता कोण याचे उत्तर तुम्हाला मिळालेच असेल. मागच्या पर्वात 12 देश होते. परंतु या पर्वात  तब्बल वीस संघाचा समावेश होता. सुऊवातीला  ही स्पर्धा कदाचित रटाळ होईल असं वाटत होतं. परंतु काही दिवसातच या स्पर्धेने कुस बदलली. लिंबू टिंबू संघाने काही संघाला दे धक्का दिला. काही सामन्यात लिंबू टिम्बु  संघाला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले हे ही तेवढच खरं .अमेरिका काहीतरी वेगळं करेल असं वाटलं होतं, तर दुसरीकडे अफगाणिस्तानने मोठ्या संघांना चकवा देत उपांत्य फेरी गाठली. अमेरिकेतील निकाल हे थोडेसे धक्कादायक होते. मिशन ठनासाऊठ मध्ये पाकिस्तान संघाचा हिरमोड झाला. अर्थात या  वाताहतीला ड्रॉप इन पीच  जबाबदार होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

Advertisement

आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत एका बाजूने अपराजित संघ तर दुस्रया बाजूने एक, दोन पराभव स्वीकारत अंतिम फेरीत पोहोचणारा संघ असं दृश्य कायम बघायला मिळायचं. परंतु ही स्पर्धा त्याला अपवाद राहिली. मी तर म्हणेन दोन अनपेक्षित संघाने अंतिम फेरीत धडक मारली. तीही आपल्या ग्रुपमध्ये पराभूत न होता. भारतीय संघ सुपरएट पर्यंत पोहोचेल हे जवळपास पक्कं होते.परंतु संघ अंतिम फेरी पर्यंत पोहोचेल हे कोणी छाती ठोकून म्हणत नव्हतं. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका चोकर्सचा डाग पुसणार की नाही हा एक मोठा प्रश्नच होता. परंतु बघता बघता एक संघ 32 वर्षानंतर तर एक संघ दहा वर्षानंतर अंतिम फेरीत पोहोचला. या स्पर्धेने मात्र अपेक्षित संघाला उपांत्य फेरीची दरवाजे बंद केले. यात ख्रया अर्थाने होरपळला तो न्युझीलँड संघ. दुसरीकडे अमेरिका सारखा संघ या स्पर्धेच्या निमित्ताने प्रकाश झोतात आला. क्रिकेट कशाशी खातात हे या निमित्ताने त्यांना समजलं असावं. दुसरीकडे अफगाणिस्तान संघ ख्रया अर्थाने कणखर बनला. क्रिकेटमधील आधारवड संघाच्या यादीत जाऊन तो बसला .नव्हे त्या दिशेने इतर संघांना जणू इशारा दिला की आमच्याकडे बघताना थोडं आदरानेच बघा. भलेही उपांत्य फेरीत त्यांचा डाव गडगडला असेल पण त्यांची कामगिरी मात्र नजरेआड करून चालता येणार नाही.

Advertisement

शेवटी आपण भारताकडे वळू. मी वरती म्हटल्या प्रमाणे हा लेख वाचत असताना तुम्हाला विश्वविजेते कोण याचे उत्तर निश्चित मिळणारच आहे. परंतु ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर भारत अंतिम फेरीत 100ज्ञ् पोहोचेल असं कोणचं छातीठोक पणे बोलत नव्हतं. अर्थात त्याला कारणही तसेच होतं. स्पर्धा सुरू होण्या अगोदर साधारणता दीड महिना आयपीएलचं धुमशान होतं. जे दोन संघ अंतिम करीत पोहोचले होते त्यामध्ये एकही भारतीय खेळाडू नव्हता. त्यातच रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळताना प्रभावी ठरला नव्हता. दुसरीकडे हार्दिक पंड्या वादाच्या भोव्रयात सापडला होता. त्यातच चार -चार स्पिनर्सची संघामध्ये निवड. या सर्व गोष्टी स्पर्धा सुरू होण्या अगोदर मारक वाटत होत्या. परंतु भारतीय संघातील खेळाडूंनी  ठतो मी नव्हेचठ म्हणत आपली कामगिरी एवढी उंचावली की बघता बघता संघ अंतिम फेरीत पोहोचला. माझ्या मते याच पूर्ण श्रेय रोहितला आहेच. परंतु त्या पाठोपाठ राहुल द्रविडला पूर्ण मार्क द्यावेच लागतील. ज्या पद्धतीने त्याने संघ हाताळला ती निश्चितच कौतुकास्पद बाब होती.

थोडक्यात काय या विश्वचषक स्पर्धेने एक गोष्ट मात्र अधोरेखित केली ती म्हणजे लिंबू टिंबू संघाला  तुम्ही गृहीत धरू नका. आणि गृहीत धरलातं तर नेमकं त्याचे काय परिणाम होतात हे या स्पर्धेने दाखवून दिले. उद्याच्या अंकात अंतिम सामन्या बद्दल बोलूच. अपेक्षा करूया अंतिम सामना रंगेल आणि सतरा वर्षाचा दुष्काळ संपेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article