महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेअर बाजारात सेन्सेक्स तिसऱ्या सत्रात तेजीत

06:45 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 594 अंकांनी वधारत बंद : लार्सन टुब्रो, टाटा स्टील नफ्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

जागतिक सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय शेअरबाजार चांगल्या तेजीसमवेत बंद झाला होता. सलग तिसऱ्या सत्रात शेअरबाजार तेजीत दिसून आला असून लार्सन अँड टूर्बो आणि टाटा स्टील यांचे समभाग सर्वाधिक तेजीसह बंद झाले होते.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सक्स निर्देशांक 594 अंकांनी वाढत 64,958 अंकांवर बंद झाला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 181 अंकांच्या वाढीसह 19,411 अंकांवर बंद झाला होता. शेअर बाजारात ओम इन्फ्रा, युनिपार्टस लिमिटेड, देवयानी इंटरनॅशनल आणि स्टोव्ह क्राफ्ट यासारख्या कंपन्यांनी तेजी राखली होती. तर दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहातील 9 लिस्टेड कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे समभाग सोमवारी तेजी राखत बंद झाले. तीन समभाग अल्पशा घसरणीसह नुकसानीत होते.

अदानी विल्मरचे समभाग 1.78 टक्के घसरणीत होते. गौतम अदानी हे  अदानी विल्मरमधील 43 टक्के वाटा विकणार असल्याची बातमी धडकल्यानंतर या कंपनीचे समभाग घसरणीत असताना दिसले. सोमवारी पतंजली फूडस्चे समभाग सर्वाधिक 4 टक्के वाढले होते. गार्डनरिच शिप बिल्डरचे समभाग 3 टक्के, देवयानी इंटरनॅशनल 2.5 टक्के, बजाज फायनान्स 2 टक्के, अॅक्सिस बँक यांचे समभाग दोनटक्के वाढीसह बाजारात व्यवहार करीत होते. तेजी राखण्यामध्ये आयसीआयसीआय बँक, आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिस आणि रेल्वेशी संबंधीत कंपनी आयआरसीटीसी तसेच रिलायन्स इंडस्ट्री व एसबीआय कार्ड यांचा वाटाही महत्त्वाचा ठरला आहे. डीव्हीज लॅब्ज, आयशर मोटर्स, आघाडीवरची दुचाकी कंपनी हिरो मोटो कॉर्प, पायाभूत सुविधा व बांधकाम क्षेत्रात कार्यरत कंपनी लार्सन टूब्रो यांनीही तेजीसह चांगली कामगिरी पार पाडली.

निफ्टी मिडकॅप, बीएसई स्मॉलकॅप यांच्या निर्देशांकात 1 टक्क्यांची तेजी राहिली होती. निफ्टी आयटी आणि निप्टी बँक यांचे निर्देशांक अनुक्रमे 0.75 टक्के, 0.68 टक्के तेजी राखत बंद झाले. एसबीआय, हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन आणि सिप्ला यांचे समभाग घसरणीत होते. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 समभाग तेजीसमवेत तर चार समभाग नुकसानीसह बंद झाले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article