For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात पेट्रोल रु. 103.91, डिझेल रु. 95.80

03:21 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यात पेट्रोल रु  103 91  डिझेल रु  95 80
Advertisement

पणजी : सोमवारी देशातील इंधन दर पुन्हा वाढले. त्यानुसार गोव्यात सध्याचा पेट्रोल दर रु. 103.91 प्रति लिटर आणि डिझेलचा दर रु. 95.80 प्रति लिटर एवढा झाला आहे. हे दर पाहिल्यास ते अनुक्रमे रु. 104 आणि रु. 96 असे झाल्यात जमा आहेत. दोन आठवड्यात झालेल्या 4 दरवाढीमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून ते संताप व्यक्त करीत आहेत. पेट्रोलचे दर रु. 2.61 ने तर डिझेलचे दर रु. 2.71 ने प्रति लिटर वाढले आहेत. दोन्ही इंधनाचे दर रु. साडेसात ते आठ अशा पैशांनी भडकले आहेत. या दरवाढीचे दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार असून महागाई वाढणार आहे. लोकांचे महिन्याचे बजेट हलले असून या दरवाढीची तरतूद करताना नाकीनऊ येणार आहेत. गेल्या दोन आठवड्यात इंधनाचे दर चारवेळा वाढले असून त्याचा फटका जनतेसह वाहनधारकांना बसला आहे. अशी जर दरवाढ होत राहिली तर इंधनाचे दर कुठे पोहोचतील याचा नेम नाही. ते तातडीने पूर्ववत किंवा स्थिर करावेत, अशी मागणी पुढे येत असून खासगी बसचालक-मालक, प्रवासी तिकीट दर वाढवण्याची मागणी करू लागले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.