महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रा. सुषमा मांजरेकर राज्यात तृतीय

06:49 PM Sep 25, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

महाराष्ट्र शासन शिlक्षण विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेतर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत उच्च माध्यमिक भाषा विभागात आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर- गोडकर यांनी राज्यात दबदबा निर्माण केला आहे. सौ.मांजरेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम व राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. जिल्ह्यासाठी १० हजार रुपये व राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचे ३० हजार रुपये व सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रा. सौ. मांजरेकर यांनी १२ वीच्या पाठ्यपुस्तकातील कल्पना दुधाळ यांच्या रोज मातीत... या कवितेची व्हिडीओ निर्मिती केली होती. लवकरच पुण्यात मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. प्रा. सौ.मांजरेकर यांनी सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय यश संपादन केले आहे. गेल्यावर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता.राज्यातील शिक्षकामध्ये तंत्रस्नेही चळवळ निर्माण व्हावी,शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी , यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक ऊच्च माध्यमिक, डीएड शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या आराज्य शैक्षणिक संशोधन परिषदेतर्फे vdo निर्मिती स्पर्धेचे आयोजन केले होते. बुधवारी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात प्रथम आलेल्या शिक्षकांचे व्हिडीओ राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. आधुनिक तंत्र, लेक्चर शैली, वकृत्च, मांडणी, नाविन्यता , विद्यार्थी केंद्रीत आशय, अध्ययन निष्पती आदी प्रमुख बाबी परीक्षण करताना विचारात घेण्यात आल्या. राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांचे व्हिडिओ शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर व पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.सौ. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर) या गेली २२ वर्षे आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागामध्ये त्या मराठी व हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत. मराठी, हिंदी, अर्थशास्त्र या तीन विषयात त्यांनी एमए पदवी संपादन केली आहे. तसेच एम एड व शालेय व्यवस्थापन पदवी अशा सात पदव्या संपादन केल्या आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समितीवर गेली दीड वर्ष तज्ञ शिक्षक म्हणून कार्यरत आहे.कोकण बोर्ड मराठी विषय तज्ञ मार्गदर्शक, कोकण बोर्ड मॉडरेटर, नवीन शिक्षण धोरण तज्ञ शिक्षक म्हणूनही सौ. मांजरेकर कार्यरत आहेत. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांच्या अंधायुग या नाटकाचे त्यांनी मराठीत पुनर्लेखन केले असून या नाटकाचे प्रयोगही महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा, महाराष्ट्र कामगार कल्याण नाट्य स्पर्धा विक्रोळी मुंबई, व अन्य ठिकाणी प्रयोग झाले आहेत. याशिवाय शुद्ध लेखनात येणाऱ्या समस्या व उपाययोजना, मराठी लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकांकडून वापरण्यात येणाऱ्या अध्यापन कार्य नितींचा अभ्यास या विषयावर लघु प्रबंध, कोरोना कालावधीतील आँनलाईन शिक्षण व उपाययोजना या विषयावर दीर्घ निबंध लेखनही केले आहे. या पूर्वी लेखक आपल्या दारी हा उपक्रमही त्यांनी राबविला आहे.कोरोना काळातील आँनलाईन शाळा व शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी हे उपक्रमही सौ मांजरेकर यांनी राबविले आहेत. त्यांच्या अध्यापनाचे व्हिडिओही यू ट्यूबवर आहेत. कोरोना महामारी काळात गोवा विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची १० १२ वी परीक्षा घेण्यातही त्यांनी सहकार्य केले होते. याशिवाय अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धांमध्ये सौ मांजरेकर यांनी पारितोषिके पटकावली आहेत. शासकीय व विविध संस्थांच्या वकृत्व व निबंध स्पर्धेत परीक्षक म्हणूनही काम केले आहे. सावंतवाडीत झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सांस्कृतिक समितीवर त्यांनी काम केले आहे. या निवडीबद्दल सौ मांजरेकर यांचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर,शिक्षणाधिकारी कविता शिंपी, उपशिक्षण अधिकारी रामचन्द्र आंगणे , गटशिक्षाधिकारी कल्पना बोडके, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश परब, उपाध्यक्ष महादेव पांगम, सचिव शांताराम गावडे, सहसचिव सिध्देश नाईक, स्कूल कमिटी चेअरमन हेमंत कामत , सर्व पदाधिकारी, संचालक , मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ,आजी.. माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # news update #
Next Article