For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात स्वयंप्रेरणेने 61,299 गुन्हे दाखल

11:03 AM Dec 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्यात स्वयंप्रेरणेने 61 299 गुन्हे दाखल
Advertisement

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची विधानपरिषदेत माहिती

Advertisement

बेळगाव : गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत राज्यात पोलिसांनी एकूण 61,299 स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल केले आहेत. देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी तीन वर्षांत 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी पाच प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. दोन प्रकरणे बी-रिपोर्ट तर तीन प्रकरणांची चौकशी सुरू असून एक प्रकरण सी-रिपोर्ट अंतर्गत आहे. 2024 मध्ये पाच गुन्हे दाखल झाले असून यापैकी बेळगावमध्येही एक गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली.

भाजपचे विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी गुरुवारी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी, स्वयंप्रेरित नोंद करण्यात आलेल्या 57,646 प्रकरणांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून एकही प्रकरण मागे घेण्यात आलेले नाही. स्वयंप्रेरित गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया ही कायद्याच्या चौकटीत आणि ठोस कारणांच्या आधारे केली जाते. विशेषत: कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्मयता असलेली परिस्थिती, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर कृत्ये, द्वेषपूर्ण भाषण या प्रकरणी पोलीस स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल करत आहेत, अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.

Advertisement

देशविरोधी घोषणेप्रकरणी तीन वर्षांत 12 गुन्हे

देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर कठोर भूमिका घेण्यात येत असल्याचे सांगत मंत्री परमेश्वर म्हणाले, गेल्या तीन वर्षांत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याप्रकरणी एकूण 12 गुन्हे दाखल करून संबंधितांना अटक करण्यात आली आहे. राज्यात कायद्या व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर, समाजविघातक किंवा देशविरोधी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कठोर कारवाई करत असून आवश्यक प्रकरणी स्वयंप्रेरणेने कारवाई सुरूच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.