महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केंब्रिज स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात

10:22 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : खासबाग, कुंतीनगर येथील भातकांडे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. सदर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे युवजन क्रीडा खात्याच्या ज्युडो प्रशिक्षक व एकलव्य पुरस्कार विजेत्या रोहिणी पाटील, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका साजीया जमादार उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या खेळाडूनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. क्रीडापटू आराध्या हावळ, खुशी, आदीती यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. आराध्याने सर्व खेळाडूना शपथ दिली. प्रमुख पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक किर्ती तितांबी, कविता पोळ, पुनम मंगनकर, वृंदा कुलकर्णी, पुजा यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article