कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फिलिपाईन्समध्ये आगीत 500 लोक बेघर

06:55 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मनिला

Advertisement

फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथील मंडलुयोंग शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या निवासी भागात शनिवारी आगीची भीषण दुर्घटना घडली. नुएवा डी फेब्रेरो येथील बारांगे प्लेझंट हिल्सच्या ब्लॉक 5 मध्ये ही आग लागली. या आगीच्या भडक्यात अनेक घरे भस्मसात झाली असून 500 हून अधिक लोक बेघर झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही. येथील घरे हलक्या आणि अत्यंत ज्वलनशील पदार्थांपासून बनलेली असल्याने आग वेगाने पसरली. आगीच्या ज्वाळा भडकल्यामुळे काळा धूर मैलभर अंतरावरूनही दिसत होता. घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन विभागाने आजूबाजूच्या भागातील 20 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पथके तैनात केली होती. मध्यरात्रीपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली, परंतु नुकसानीचे मूल्यांकन अद्याप सुरू आहे. मेट्रो मनिलामधील गरीब वस्त्यांमध्ये अशा आगीच्या घटना वारंवार घडतात. येथील घरे एकमेकांशी खूप चिकटून बांधलेली असल्याने मदत व बचावकार्यातही अडचणी येतात. रस्ते अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलांना प्रवेश करणे कठीण होते. आता घडलेली ही ताजी घटना पुन्हा एकदा शहरातील अग्निसुरक्षा समस्येवर प्रकाश टाकते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article