नववर्षात पणजी मनपासह 11 पालिकांच्या निवडणुका
विद्यमान प्रभागांनुसारच होणार निवडणूक
पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता नववर्षात राज्यातील 11 नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका 2021 च्या निवडणुकांच्या वेळी अस्तित्वात असलेल्या प्रभागांच्या सीमांनुसारच घेण्यात येणार आहेत. पालिका प्रशासन संचालनालयाने त्यासंबंधी निर्णय घेतला असून पालिका निवडणुकांपूर्वी प्रभागांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया करण्यात येणार नाही. सरकारने पालिकांच्या सीमा, गावांची अधिकारक्षेत्रे आणि विधानसभा मतदारसंघांसह सर्व प्रशासकीय सीमांवर बंदी घालण्याच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 2027 च्या जनगणनेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ही बंदी 31 डिसेंबर 2025 पासून लागू झाली असून 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहणार आहे. एप्रिल 2026 मध्ये 11 पालिकांची निवडणुका होणार आहेत. पणजी मनपाची निवडणूक मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे.