For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाजारात सेन्सेक्सची 1440 अंकांवर उसळी

07:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाजारात सेन्सेक्सची 1440 अंकांवर उसळी
Advertisement

चौथ्या सत्रात बाजार भक्कम : निफ्टीही विक्रमी उंचीवर

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात भक्कम स्थिती राहिली. यामध्ये सेन्सेक्सने तब्बल 1440 अंकांची उसळी घेतली आहे. तर निफ्टीही 470 वर मजबूत होत नव्या विक्रमासह बंद झाला आहे. सेन्सेक्स व निफ्टी हे 1 टक्क्यांहून अधिकने वधारले आहेत. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सने प्रथमच 83,000 चा टप्पा ओलांडला. निफ्टीही विक्रमी पातळीवर बंद झाला. विश्लेषकांच्या मते, प्रमुख कंपन्यांच्या समभागांमधील खरेदी आणि परकीय भांडवलाचा ओघ तसेच जागतिक बाजारातील तेजीमुळे बाजारातील बाजारांना मोठी मदत झाल्याचे स्पष्ट केले आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसईच्या 30 समभागांमध्ये दिवसअखेर सेन्सेक्स 1439.55 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 1.77 टक्क्यांनी वाढून 82,962.71 या नवीन उच्चांकावर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्स 81,534.29 आणि 83,116.19 च्या रेंजमध्ये व्यवहारात राहिला आहे. दुसरीकडे, एनएसई निफ्टी दिवसअखेर 470.45 अंकांच्या मदतीने निर्देशांक 1.89 टक्क्यांसोबत  25,388.90 च्या नव्या उंचीवर बंद झाला आहे.

Advertisement

गुरुवारी सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 29 समभाग तेजीसह बंद झाले. यामध्ये  एनटीपीसी, भारती एअरटेल, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील आणि अदानी पोर्ट्स हे सेन्सेक्समध्ये पहिल्या पाचमध्ये राहिले आहेत. याशिवाय एसबीआय, टेक महिंद्रा, टाटा स्टील, एल अँड टी, कोटक बँक, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, एचयूएल, एचसीएल टेक, पॉवरग्रिड, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, टायटन, एचडीएफसी बँक, मारुती, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, सन फार्मा, आयटीसी, टीसीएस आणि एशियन पेंट्सचे समभागही वधारले. अन्य कंपन्यांमध्ये केवळ नेस्ले इंडियाच्या समभागांमध्ये घसरण दिसून आली. त्याचे समभाग हे 0.09 टक्क्यांनी घसरले. रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, खरेदी आणि विक्री हलकी होती. व्यवहाराच्या शेवटच्या एक-दोन तासांत सर्वच क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार खरेदी झाल्याने बाजार तेजीत गेला.

अन्य बाजारांचा प्रवास

आशियातील इतर बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई आणि हाँगकाँगचा हँगसेंग चांगला वाढला, तर चीनचा शांघाय कंपोझिट किरकोळ प्रभावीत होता. प्रमुख युरोपियन बाजार व्यवहारादरम्यान तेजीत होते. बुधवारी अमेरिकेच्या बाजारांमध्ये मोठी वाढ झाली. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणशास्त्रज्ञ व्हीके विजय कुमार म्हणाले, ‘अमेरिकेतील चलनवाढीचा डेटा बाजारासाठी काहीसा सकारात्मक आहे. महागाई वाढीचा वेग ऑगस्टमध्ये 2.9 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांवर घसरला. मूळ चलनवाढ 3.2 टक्के वर राहिल्याने, फेडरल रिझर्व्ह सावध राहू शकते आणि व्याजदरात 0.50 टक्के कपात करण्यापासून परावृत्त होऊ शकते आणि 0.25 टक्के कपातीची निवड करू शकते.

समभाग वधारलेल्या कंपन्या

  • भारती एअरटेल    1646
  • एनटीपीसी            404
  • महिंद्र अॅण्ड महिंद्रा    2742
  • जेएसडब्ल्यू स्टील 955
  • स्टेट बँक               788
  • टेक महिंद्रा           1641
  • टाटा स्टील            151
  • लार्सन अॅण्ड टुब्रो  3622
  • कोटक महिंद्रा      1826
  • इन्फोसिस             1950
  • रिलायन्स इंडस्ट्रीज   2958
  • हिंदुस्थान युनि       2953
  • एचसीएल टेक       1805
  • पॉवरग्रिड कॉर्प     337
  • इंडसइंड बँक        1443
  • अॅक्सिस बँक         1203
  • टायटन                   3763
  • एचडीएफसी बँक      1666
  • मारुती सुझुकी      12392
  • आयसीआयसीआय   1251
  • टाटा मोटर्स               986
  • बजाज फायनान्स     7425
  • सनफार्मा               1864
  • आयटीसी              4503
  • एशियन पेन्ट्स      3382
  • नेस्ले                   2524
  • कोल इंडिया          495
  • बँक ऑफ बडोदा 237
  • सिप्ला                 1653
  • अशोक लेलँड       246
  • ल्यूपिन                2251
  • ब्रिटानिया            6098
  • अंबुजा सिमेंट        629
  • बीपीसीएल          343
  • सिमेन्स             6654
  • मॅरिको              685
  • कमिन्स           3823

समभाग घसरलेल्या कंपन्या

  • कोलगेट              3641
  • एव्हेन्यू सुपरमार्ट   5237
  • झोमॅटो                283
  • होनासा कंझ्युमर्स   493
Advertisement
Tags :

.