बाजारात अंतिम सत्रात विक्रमी तेजीला विराम!
सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद : तेल व गॅस, एफएमसीजी क्षेत्रात विक्रीचा प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय बाजारात मागील सहा सत्राच्या विक्रमी तेजीला अखेर चालू आठवड्यातील अंतिम सत्रात विराम मिळाला आहे. यामध्ये सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकातील मुख्य समभागांमध्ये विक्रीचा कल राहिला होता. गुंतवणूकदारांनी जागतिक बाजारांमधील मंदीच्या संकेतामुळे तेल आणि गॅस, एफएमसीजी आदी समभागांमध्ये विक्री झाल्याचा परिणामही भारतीय बाजारात झाला आहे. तसेच जीएसटी परिषद होणार असून यामध्येही आणखीन कोणते बदल होणार आहेत तेही पहावे लागणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 269.03 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 77,209.90 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसखेर 65.90 अंकांनी घसऊन निर्देशांक 23,501.10 वर बंद झाला आहे.
शेअर बाजारातील 30 समभागांमधील 9 समभाग हे वधारले आहेत. यामध्ये एअरटेल, इन्फोसिस, टीसीएस, जेएसडब्लू स्टील आणि एनटीपीसी यांचे समभाग हे वधारले आहेत. यासह कोटक बँक, पॉवरग्रिड कॉर्प, एचसीएल टेक, विप्रो आणि माऊती सुझुकीचे समभाग हे नफा कमाईत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये 21 समभाग हे नुकसानीत राहिले. अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अॅण्ड टुब्रो, टाटा मोर्ट्स, नेस्ले इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्यासह अन्य समभाग प्रभावीत राहिले आहेत.
मान्सूनची संथगतीच्या दरम्यान देशातील बाजारांमध्ये काहीशी नफावसुली राहिली आहे. ज्याचा परिणाम हा एफएमसीजी क्षेत्रातील कामगिरीवर झाला आहे. दुसरीकडे उत्तर भारतात उष्णतेची लाट राहिल्याने कंझ्युमर ड्युरेबल्सच्या समभागात तेजी राहिली होती. तसेच एक्सेंचरच्या नकारात्मकतेमुळे अमेरिकन टेकचे समभागातही नफावसुली राहिली आहे. यामुळे जागतिक बाजारात नरमाईचा कल राहिल्याचे दिसून आले.