महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तरुण-शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवडणूक रिंगणात

11:17 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नितीन म्हाडगुत यांनी दाखल केला अर्ज

Advertisement

बेळगाव : तरुणांना रोजगार मिळावा, शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवत आहे, असे सांगत नितीन अशोक म्हाडगुत यांनी अपक्ष म्हणून गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आजपर्यंत मी सामाजिक कार्याबरोबरच विविध संघटनांचा पदाधिकारी म्हणून काम केले आहे. त्या अनुभवावर निश्चितच मी जनतेच्या समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दि माईन्स ओनर्स अॅण्ड मिनरल ट्रेडर्स असोसिएशन कर्नाटक राज्याचे माजी अध्यक्ष नितीन म्हाडगुत यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप व काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. याचबरोबर तरुणांचा रोजगारही काढून घेतला आहे. माईन्स ओनर्स अॅण्ड मिनरल ट्रेडर्स असोसिएशनला विश्वासात न घेता विविध अटी लादण्यात आल्या. त्यामुळे या व्यावसायिकांबरोबरच शेतकरीही अडचणीत आला आहे. त्यामुळे त्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. तेव्हा आता मतदारांनीच मला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article