मुंबई विद्यापिठाच्या अँथलेटीक्स स्पर्धेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे यश
वेंगुर्ले(वार्ताहर)-
मुंबई विद्यापीठ अंतर्गत मुंबई मरिन लाईन, स्पोर्टस पॅव्हेलियन येथे दि. ३ व ४ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या अँथलेटिक्स स्पर्धेत हर्डल प्रकारात बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथील विद्यार्थिनी कु. गायत्री राणे तर कबड्डी स्पर्धेत कु. अपूर्वा परच, यांनी तर चिपळूण-डेरवण येथील अँथलेटीक्स स्पर्धेत तिहेरी उडी प्रकारात निकीता निनावे तर १० हजार मीटर धावणे प्रकारांत भूमिका माशलकर यांनी नेत्रदिपक यश पटकाविले.
मुंबई विद्यापीठ अँथलेटिक्स स्पर्धेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथील विद्यार्थिनी कु. गायत्री राजाराम राणे हिने १०० मीटर हईल स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करुन रौप्य पदक पटकावले. तसेच ४०० मीटर हर्डल मध्ये कास्य पदक प्राप्त केले. तर महाविद्यालयाची कबड्डी खेळाडू कु. अपूर्वा सतीश परब हिने मुंबई विद्यापीठ कबड्डी स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले. तसेच चिपळूण- डेरवण येथे घेण्यात आलेल्या अँथलेटिक्स स्पर्धेत कु. निकिता राजेंद्र निनावे हिने तिहेरी उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि हेप्टथ लॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर कु. भूमिका मंगेश माशलकर हिने १० हजार मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला
या सर्व विजेत्या खेळाडूंचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव मा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा. डॉ. सौ. मंजिरी मोरे देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले. प्रा. डॉ. आनंद बांदेकर, क्रीडासंचालक प्रा. जे. वाय. नाईक, प्रा. डॉ. विलास देऊलकर, प्रा. डी. जे. शितोळे, प्रा. व्ही. पी. देसाई, प्रा. डी. आर. आरोलकर, प्रा. कमलेश कांबळे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.