For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपघातात दोघांना ठार करून पलायन करणाऱ्या कॅन्टरला पकडले

10:17 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
अपघातात दोघांना ठार करून पलायन करणाऱ्या कॅन्टरला पकडले
Advertisement

आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रसंगावधानामुळे कॅन्टर ताब्यात

Advertisement

खानापूर : खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर हे बेंगळूर येथे मंगळवार दि. 19 रोजी होणाऱ्या बैठकीसाठी खानापूरहून सायंकाळी सात वाजता बेंगळूकडे निघाले होते. हुबळीजवळ मालवाहतूक करणाऱ्या क्र. एमएच 15 ईव्ही 6600 या कॅन्टरने एक रिक्षा आणि दुचाकीला ठोकर दिल्याने रिक्षातील दोघेजण जागीच ठार झाले होते. तसेच इतर काहीजण जखमीं झाले होते. मात्र यावेळी कोणीही मदतीसाठी थांबत नसल्याने आमदार स्वत: थांबून पोलिसांना याबाबत माहिती देऊन जखमींना मदत केली. या अपघाताला कारणीभूत असलेला कॅन्टरचालक न थांबता तसाच भरधाव पुढे गेला होता. मागोमाग आमदार विठ्ठल हलगेकर वाहनातून बेंगळूरकडे जात होते. अपघातस्थळी स्वत: थांबून जखमींची विचारपूस करून याबाबत पोलिसांना माहिती देऊन पाचारण केले. त्यानंतर ज्या कॅण्टरने ठोकरले त्या कॅन्टरचा नंबर लक्षात ठेवून याबाबत पुढील पोलीस स्थानकात माहिती दिली व त्याचा पाठलाग सुरू केला. 50 किलोमीटर पाठलाग केल्यानंतर हावेरी  जिह्यातील बंकापूर येथील टोलनाक्यावर पोलिसांच्या मदतीने कॅन्टरला अडविण्यात यश आले होते. मात्र चालक उडी मारून फरार झाला असून पोलिसांनी कॅन्टर ताब्यात घेतला आहे. हावेरी पोलीस पुढील तपास करत आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळाले. तसेच मृतांच्या नातेवाईकांनाही घटनेची माहिती दिल्याने पुढील कारवाई करण्यात आली आहे.  यावेळी आमदारांसोबत कृषी पत्तीन सोसायटीचे संचालक शंकर पाटील, भाजपचे तालुका सेक्रेटरी बसवराज सानीकोप, शिवाजी कोळेकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.