‘‘तेलंगणात ओबीसी समाजातील व्यक्ती मुख्यमंत्री होईल : पंतप्रधान मोदी
‘‘तेलंगणात भाजप सत्तेवर आल्यास ओबीसी समाजातील व्यक्ती मुख्यमंत्री होईल,’’ असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं आहे. तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान हाेत असून, मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.तेलंगणातील मेहबूबाबाद व करीमनगर येथील प्रचार सभांमध्ये ते बोलत होते.
पंतप्रधान मोदींनी सोमवारी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते तेलंगणातील प्रचार सभेसाठी गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस व ‘बीआरएस’वर टीका केली. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे फार्महाऊस मुख्यमंत्री असल्याचा टोला मोदी यांनी लगावला. तेलंगणमध्ये परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा संगम असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी केले. ते म्हणाले, ‘‘तेलंगणात आम्ही ज्या हमी दिल्या आहेत त्या पूर्ण होणाऱ्या आहेत.
काँग्रेसने जातिनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसींवरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्या ओबीसी मुद्द्यावरून गरिबी हीच एक जात असल्याचे तेलंगणात म्हटले होते. त्यावरून, गरीब हीच एक जात असेल तर पंतप्रधान ओबीसी असल्याचा दावा का करतात, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी आज भूमिका स्पष्ट केली.
‘बीआरएस’ किंवा काँग्रेससारख्या आमच्या हमी हवेत विरून जाणाऱ्या नाहीत. तेलंगणात भाजपला सत्ता मिळाल्यानंतर ओबीसी समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात येईल.’’ तेलंगणात आम्ही ज्या हमी दिल्या आहेत त्या पूर्ण होणाऱ्या आहेत. असही ते म्हणले आहेत. काँग्रेसने माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना आदराची वागणूक दिली नसल्याचा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केला.