For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हद्दवाढीच्या समर्थनार्थ आज शिवाजी चौकात धरणे आंदोलन

10:53 AM Mar 23, 2025 IST | Pooja Marathe
हद्दवाढीच्या समर्थनार्थ आज शिवाजी चौकात धरणे आंदोलन
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी आज रविवार दि. 23 मार्चपासून तीव्र आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. आज शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार असुन या आंदोलनात जिह्यातील आजी माजी आमदार, खासदार, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार यांनी सहभागी व्हावे, अन्यथा ते हद्दवाढीच्या विरोधात असल्याचे समजण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीने पत्रकार परिषदेत दिला.

आज रविवारी सकाळी 11 ते 1 या वेळेत हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनासंर्दभांत कृतीसमीतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज, खा. धनंजय महाडिक, . सतेज पाटील, . राजेश क्षीरसागर, . चंद्रदीप नरके, . अशोकराव माने, . शिवाजी पाटील, .राहूल आवाडे,. विनय कोरे, तसेच राजेश पाटील, ऋतुराज पाटील, राजेश लाटकर, राहूल पाटील यांना उपस्थित राहण्यासंदर्भात कृती समितीने पत्रे पाठविली आहेत.पत्रकार परिषदेस आर.के.पवार,बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, अशोक भंडारे यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.