For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime : सोलापूरमध्ये नवऱ्याशी का बोलते म्हणून एका महिलेकडून दुसरीला मारहाण

04:47 PM Feb 16, 2026 IST | NEETA POTDAR
solapur crime   सोलापूरमध्ये नवऱ्याशी का बोलते म्हणून एका महिलेकडून दुसरीला मारहाण
Advertisement

                               सोलापूरमध्ये महिलांवर काठीने मारहाण

Advertisement

सोलापूर : माझ्या नवऱ्याशी का बोलते असे म्हणून एका महिलेने दुसऱ्या महिलेस मारहाण करून जखमी केले. अर्चना नागनाथ मुकूटकर (वय ३५, रा. बाघोली, ता. मोहोळ) असे जखमी महिलेचे नाव आहे. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास अर्चना मुकूटकर यांना संध्या वाघमारे या महिलेने माझ्या नवऱ्याशी का बोलते असे म्हणून काठीने मारहाण केली. यामध्ये अर्चना मुकूटकर यांच्या सर्वांगास मुकामार लागल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

दुधनी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेस मारहाण

Advertisement

दुधनी (ता. अक्कलकोट) येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेस मारहाण करून जखमी करण्यात आले. रेणुका अर्जुन गोटे (वय ३६, रा. दुधनी) असे जखमी महिलेचे नाव आहे. १२ फेब्रुवारी रोजी दहाच्या सुमारास रेणुका गोटे यांच्या राहत्या घराजवळ शेजाऱ्यांचे भांडण सुरु होते. त्यावेळी रेणुका या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता रेणुका यांना दशरथ मंजूळकर व कमलाबाई मंजूळकर यांनी काठीने मारहाण करून जखमी केले. रेणुका यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिव्हिल पोलीस चौकीत याची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.