Sangli ! सांगलीत जिप गट आणि पं. समिती गणाची सोमवारी आरक्षण सोडत
उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांची माहिती
सांगली : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच दहा पंचायत समित्यांच्या स्तरावर विविध प्रवर्गातील (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व महिला) आरक्षण सोडत सोमवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी दिली.
जिल्हा परिषद सांगलीसाठी एकूण ६१ निवडणूक गट असून या सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे पार पडणार आहे. पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीसाठी तहसीलनिहाय सभा खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे.
आटपाडी : ८ गण पंचायत समिती आटपाडी येथील बैठक सभागृह. जत: १८ गण तलाठी भवन, तहसील कार्यालय जतच्या आवारात. खानापूर ८ गण बैठक सभागृह, तिसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विटा. कडेगाव ८ गण तहसील कार्यालय कडेगाव, पहिला मजला. तासगाव : १२ गण शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तासगाव.
कवठेमहांकाळ ८ गण आर. आर. (आबा) पाटील सभागृह, पंचायत समिती कवठेमहांकाळ पलूस : ८ गण तहसील कार्यालय पलूस, पहिल्या मजल्यावरील सभागृह. वाळवा २२ गण लोकनेते राजारामबापू नाट्यगृह, इस्लामपूर. शिराळा ८ गण तहसील कार्यालय शिराळा, मिरज २२ गण पंचायत समिती मिरज दुसरा मजला, प्रशासकीय इमारत. वसंतरावदादा पाटील सभागृह,