राधानगरी तालुक्यातील निवडणूकीमध्ये तीन ठिकाणी सत्तातर तर सहा ठिकाणी सत्ता टिकवली
राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील नऊ पंचवार्षिक आणि दोन पोटनिवडणुका लागलेल्या ग्रामपंचायतींचा निकाल आज राधानगरी तहसीलदार कार्यालयातील शाहू सभागृहात जाहीर झाला.सर्वच ग्रामपंचायतींमध्ये पक्षीय बलापेक्षा स्थानिक आघाडीना यश आले.तीन ठिकाणी सत्तातर झाले तर सहा ठिकाणी सत्ता टिकविण्यास यश आले .संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कसबा वाळवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राधानगरी पंचायत समितीच्या माजी सभापती वनिता भरत पाटील आणि सरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रणधिरसिंह विजयसिंह मोरे हे प्रचंड मताधिक्यानी विजयी झाले.तर राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण फेजीवडे येथे माजी सरपंच बशीर राऊत, फारुख नावळेकर, वसीम कलोट यांच्या राजश्री छ, शाहू महाराज विकास आघाडीच्या लोकनियुक्त सरपंच पदी प्रतिभा भरत एकावडे ह्या निवडून आल्या आहेत तर सदस्य पदी10 पैकी 10 जागा विजय प्राप्त करून निर्विवाद यश संपादन केले.
सकाळी साडेआठ वाजता निवडणूक अधिकारी अनिता देशमुख पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निकालाला सुरवात करण्यात आली. सर्वप्रथम न्यू करंजे येथे सरपंच आणि एका सदस्यपदाच्या जागेसाठी दुरंगी लढत होती.येथे सरपंचपदी सद्दाम तांबोळी हे विजयी झाले.चांदेकरवाडी येथे सत्तातर झाले सदस्यपदाच्या सर्व जागांसाह सरपंचपदी सीमा हिंदुराव खोत हयाविजयी झाल्या आहेत , तसेच फराळे येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील व आम, प्रकाश आबीटकर यांच्या गटाच्या वैशाली संदीप डवर या निवडून आल्या आहेत, मांगेवाडी येथे प्रवीण नामदेव ढवण हे विजयी झाले आहेत, पालकरवाडी या ग्रामपंचायतमध्ये महेश नामदेवराव भोईटे हे विजयी झाले आहेत,