पाकिस्तानात अजब कबड्डी थप्पड लगावून सुजवितात गाल
सर्वसाधारणपणे प्रत्येक ठिकाणी स्वत:चा असा पारंपरिक क्रीडाप्रकार असतो. एखाद्या खेळात शारीरिक मेहनतीला महत्त्व दिले जाते. तर काही खेळांमध्ये बौद्धिक क्षमतेची कसोटी लागते. आमच्या देशात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. त्याचप्रकारे शेजारी देश पाकिस्तानातही क्रीडाप्रकार प्रचलित आहेत. तेथील क्रीडाप्रकारात एक असा खेळ आहे जो स्वत:च्या अजब नियमांमुळे चर्चेत राहिला आहे.
पाकिस्तानात कबड्डी थप्पड लगावून खेळली जाते, याला स्लॅप कबड्डी म्हटले जाते अणि याची छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर लोकांना स्वत:चे हसू आवरता येत नाही. परंतु शेजारच्या देशात हा खेळ अत्यंत गांभीर्याने खेळला जातो आणि रितसर तेथे याच्या स्पर्धाही आयोजित होतात
थप्पड कब•ाr नावाने प्रसिद्ध या क्रीडाप्रकाराला विशेषकरून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात खेळले जाते. यात दोन खेळाडू असतात, जे परस्परांना थप्पड लगावत असतात. प्रत्येक थप्पडवर त्यांना एक गुण मिळतो, दोन्ही खेळाडू केवळ थप्पड लगावू शकतात, मुक्का मारण्याची यात अनुमती नाही. यात कुठलीच वेळेची मर्यादा नसते. समोरील खेळाडू जोपर्यंत हार मानत नाही तोवर खेळ खेळला जातो किंवा कुठल्याही थप्पडेमुळे समोरील खेळाडू जखमी झाल्यास तो बाद ठरतो. याला चांटा कब•ाr किंवा तमाचेदार कब•ाr देखील म्हटले जाते.
सोशल मीडियावर या अजब कब•ाrचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाला आहे. याला क्रीडाप्रकार का म्हणतात हेच लोकांना माहित नाही. परंतु हा खेळ पाहणे लोक पसंत करतात. तसेही पाकिस्तानातील लोकांना सामान्यऐवजी थाप-थपकीयुक्त कब•ाr पाहणे अधिक पसंत असते. भारतीय लोकांच्या कब•ाrपेक्षा हा प्रकार अत्यंत वेगळा आहे.