For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | नागावमध्ये भव्य इंद्रध्वज महामंडळ विधान व महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात

12:32 PM Mar 30, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   नागावमध्ये भव्य इंद्रध्वज महामंडळ विधान व महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात
Advertisement

                 नागावात तीर्थंकर सुमतीनाथ जन्मकल्याणक विधी संपन्न

Advertisement

पुलाची शिरोली - नागाव येथील भव्य इंद्रध्वज महामण्डल विश्वशांती आराधना व महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या पवित्र भूमीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य धार्मिक महोत्सवात श्रद्धा आणि भक्तीचा अपूर्व संगम पाहायला मिळाला. भगवान सुमतीनाथ तीर्थंकर जन्मकल्याणक आणि केवलज्ञान कल्याणक निमित्ताने विविध धार्मिक विधी उत्साहात पार पडले.

पहाटे सहा वाजल्यापासूनच मंगलवाद्य घोषाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौधर्म इंद्र-इंद्राणी आणि ईशान्य इंद्र-इंद्राणींचे मंडपात आगमन होताच वातावरण प्रसन्न झाले. त्यानंतर जिनाभिषेक, नित्यक्रिया आणि मुख्य यज्ञनायकाद्वारे 'होम-हवन' करण्यात आले. कुबेर इंद्राद्वारे झालेली 'रत्नवृष्टी' हे भाविकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. राजेंद्र जैन (उमरगा) यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या 'भव्यनागाव येथील भव्य इंद्रध्वज महामण्डल विश्वशांती आराधना व महावीर जन्मकल्याणक महोत्सवात मौजीबंधन व यज्ञोपवीत संस्कार झाला.

Advertisement

इंद्रसभा दृश्याने उपस्थित भाविकांचे डोळे दीपवले. सकाळी आठ वाजता जलकुंभमिरवणुकीनंतर पंचामृताभिषेक आणि शांतिधारा करण्यात आली. या प्रसंगी मौजीबंधन, यज्ञोपवीत संस्कार आणि कुमारिका मुलींचा 'भाग्योदय संस्कार' अत्यंत विधीवत पार पडले. दुपारी आचार्यश्रींचे मंगल प्रवचन ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी चार वाजता 'जिनवाणी मिरवणूक' काढण्यातआली,

ज्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्री आठ वाजता देव-शास्त्र-गुरु संगीत आरतीनंतर कुंडलपूर नगरीत 'माता त्रिशला सोळा स्वप्न दर्शन', 'नगररचना' आणि 'गर्भकल्याणक दृश्य' सादर करण्यात आले. तसेच गर्भवती मातांसाठी आयोजित 'गर्भसंस्कार विधीने या महोत्सवाला एक सामाजिक आणि आध्यात्मिक उंची प्राप्त करून दिली.

महोत्सवात रंगत
काल पार पडलेल्या 'इंद्रध्वज महामंडळ विधान' आणि 'मंगलकुंभहत्ती-घोडे सवाला'ने महोत्सवाची रंगत अधिकच वाढवली होती. या संपूर्ण सोहळ्यामुळे परिसरात मंगलमयी वातावरण निर्माण झाले असून, हजारो जैन धर्मिय भाविकांनी या अमृतसोहळ्याचा लाभ घेतला.

Advertisement
Tags :

.