महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

माजगावात जीर्ण झाड गाड्यांवर पडून दोन दुचाकींचे नुकसान

04:05 PM Jun 25, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

गाड्यांची भरपाई मिळेपर्यंत झाड हटवू देणार नसल्याची गाडी मालकांची भूमिका

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
माजगाव - चराठे उद्यमनगर मुख्य रस्त्यावर जीर्ण झाड विद्यूत वाहिन्यांनंतर त्या खाली उभ्या दोन दुचाकींवर पडल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेवेळी पाऊस सुरू असल्याने वाहतूक किरकोळ होती. त्यामुळे अनर्थ टाळला. त्यानंतर जो पर्यंत गाड्यांची नुकसान भरपाई मिळत नाही तो पर्यंत गाड्या हटवणार नाही अशी भूमिका वाहन मालकांनी घेतली होती. त्यामुळे घटना घडूनही चार तास हे झाड जैसे थे होते.यावेळी वीज आणि सार्वजानिक बांधकाम खात्याचे अधिकारी तात्काळ घटना स्थळी दखल झाले. अखेर या दोन्हीं वाहन चालकांना भरपाई दिल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने हे झाड मुख्य रस्त्यावरून हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.दरम्यान ,या धोकादायक जीर्ण झाडाबाबत विज वितरण तसेच सार्वजानिक बांधकाम खात्याचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले होते. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच हा प्रकार घडला.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news# majgao # news update
Next Article