महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवसंघर्षा निमित्ताने कोकणात

06:21 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यावर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत़ याची पूर्वतयारी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने सुरु केली आह़े रत्नागिरी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे स्थान मजबूत रहावे म्हणून पक्षातील विविध नेते कार्यरत होत़े परंतु निवडणुकीचे आव्हान लक्षात घेता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षसंघटनेतील घटकांपर्यंत जाऊन त्यांना कार्यरत करण्यासाठी सोमवारी राजापुरला मोठा कार्यक्रम घेतल़ा शिवसंघर्ष अभियानामध्ये व्यापक जनसंपर्काचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना हाक दिल़ी शिवसेना शिंदे गट येती निवडणूक हलक्यात घेणार नसून मैदानातील सर्वांना त्याची चांगलीच दखल घ्यावी लागेल़, असा इशारा दिला आह़े

Advertisement

शासनाच्या विविध योजना तळगाळातील प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यात शिवसेनेच्यावतीने शिवदूत ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजापूर येथील शिवसंपर्क अभियान सभेत केली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले राम मंदिराचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केले आहे. त्यामुळे ‘फिर एक बार.. मोदी सरकार..’ आणि राज्यात लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार 45 पार..’ असा नाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी या सभेत दिला.

Advertisement

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने (शिंदे गट) राज्यात शिवसंकल्प अभियान राबविण्यात येत असून याचा एक भाग म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसंपर्क अभियान कार्यक्रम राजापूर शहरात पार पडला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योजक व रत्नसिंधु योजनेचे सदस्य किरण सामंत, माजी आमदार रवींद्र फाटक उपस्थित होत़े

सरकार आणि जनता यातील दुवा म्हणून शिवदूत ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. शासनाच्या योजनेची माहिती प्रत्येक घरात पोहोचवून त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवदुतांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केल़े मी घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही, तर रस्त्यावर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावल़ा खासदारकीसाठी कितीही इच्छुक असले तरी काम करणाऱ्यालाच तिकीट मिळणार असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत:च्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली असून कोकणातील सर्व नेत्यांना त्यामध्ये सामावून घेतले आहे. राजापूर तालुक्यातील बहुचर्चित अशा बारसू, सोलगाव, गोवळ येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात साधा उल्लेखही केला नाही. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या राजापुरात झालेल्या शिवसंपर्क अभियान मेळाव्यात प्रमुख वक्त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी शिवसेनेचाच उमेदवार हवा अशी आग्रही मागणी करताना किरण उर्फ भैय्या सामंत हेच लोकसभेचे उमेदवार असावेत असे सुचित केले.

राजकीय पक्षांच्या बेरीज वजाबाकी आणि शक्तीप्रदर्शनामुळे पक्ष संघटना ढवळून निघत आह़े नगर परिषदा, जिल्हा परिषदा यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्था सध्या लोकप्रतिनिधीविना आहेत़ या स्वराज्य संस्थांमध्ये पदे मिळावीत म्हणून अनेक कार्यकर्ते उत्सुक आहेत़ एका पदाच्या उमेदवारीसाठी 5 पेक्षा अधिक लोक इच्छुक बनले आहेत़ सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका न घेता केवळ लोकसभा निवडणुका घेण्याचे चित्र उभे राहत आह़े पदासाठी कनिष्ठ संस्थांमध्ये इच्छुक असलेले कार्यकर्ते लोकसभेसाठी एकजुटीने काम करतील असे लक्षात घेऊन रणनिती आखण्यात येईल़ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उशिराने घेतल्यास एकजुट कायम राहिल़ असे धोरण त्यामागे असल्याचे दिसून येत आह़े वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसारखे मातब्बर नेते अंमलबजावणी करत आहेत़

शिंदे यांनी शिवदूत नावाची मांडलेली कल्पना म्हणजे कार्यकर्त्याला प्रचाराच्या रणमैदानात उतरवण्याची रणनिती आह़े शासकीय योजना विद्यमान सरकारने अधिक प्रभावी राबवल्याचे जनमानसात ठसवून द्यावे असा, विचार त्यामागे आह़े. समाज माध्यमे, दूरचित्रवाहिन्यांसारखी आधुनिक माध्यमे कार्यरत असली तरी मानवी अस्तित्वाचे महत्त्व सार्वजनिक जीवनात कमी होत नाह़ी अशा वेळी सत्ताधारी पक्षाचा दमदार कार्यकर्ता किती प्रभावीपणे उभा राहतो यावर प्रचाराचा जोर अवलंबून आह़े रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात राजापूर सारखे मध्यवर्ती ठिकाणी निवडून तेथे संघटनेला कार्यरत करण्याचे पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलल़े सरकार स्थापन झाल्यापासून इतक्या वरिष्ठ स्तरावरचे शिवसेना शिंदे गटाचे नेते कोकणच्या मैदानात उतरले नव्हत़े प्रथमच एवढ्या मोठ्या ताकदीने संघटनेला संबोधित करणारे लोक उपस्थित झाले याची दखल पक्ष कार्यकर्त्यांनी चांगल्यापैकी घेतली आह़े त्याचा उपयोग कितपत होतो हे आगामी काळात दिसणार आह़े

निवडणुकीच्या पूर्वी विशिष्ट अंतराने सभा बैठका घेउढन कार्यकर्ते कामास लावणे हे आवश्यक असत़े तथापि पक्षाची संघटना वर्षाचे सर्व दिवस कमी अधिक प्रमाणात कार्य करण्यासाठी विशेष लक्ष घातले पाहिज़े तसे लक्ष शिवसेनेच्या शिंदे सरकारने घातले नव्हत़े सरकार संभाळून काही काम करणे यालाच प्राधान्य होत़े लोकशाहीत निवडणुकीशिवाय पुढील कार्यकाळाचा टप्पा गवसणार नाही, याची जाण असल्याने आता मैदानात उतरणे अपरिहार्य झाले आह़े याची जाण वरिष्ठांना झाली आणि त्यातून नेत्यांनी शिवसंघर्ष अभियान हाती घेतले आह़े यामध्ये सगळ्यात पहिला संघर्ष ठाकरे गटाशी होणार हे सर्वश्रूत आह़े कधी काळी सोबत काम केलेल्या लोकांना विरोधक म्हणून समोर ठेवून राजकारण करणे आवश्यक ठरले आह़े

सुंकांत चक्रदेव

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article