Kolhapur weather : कोल्हापुरात पुन्हा थंडीचा कडाका वाढला
शाळकरी विद्यार्थ्यांना वाढत्या थंडीचा मोठा फटका
कोल्हापूर: नोव्हेंबरमध्ये सर्व विक्रम मोडणारी थंडी सुरु झाली होती. पण गेल्या आठवड्यामध्ये कडाक्याची थंडी अचानक गायब झाली होती. दिवसभर थोडे उष्म वातावरण रात्री थोडासा उकाडा असे विचित्र बाताबरण निर्माण झाले होते. मात्र, आता पुन्हा थंडी परतली आहे.
तापमानामध्ये घसरण होत असल्याने, थंडी अंगाला झोंबत आहे. चंदाचा हिवाळा हा इतर वर्षाच्या तुलनेत अधिक रखि असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सोमवारी कोल्हापुरात १९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये बंडीचा कडाका अजून वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
कोल्हापूर शहरात मागच्या आठवडाभरापासून थंडीची लाट कायम आहे. तापमान १९ अंश खाली गेल्याने प्रचंड गारठा निर्माण झाला आहे. हवेत गारवा असल्याने विवसभर थंडी टिकून असल्याने शाळकरी विद्यार्थी, वृध्द आणि नागरिक उबदार कपक्यांचा वापर करत आहेत. सकाळी ग्रामीण भागातून शहरात येणारे दूध विक्रेते, भाजी विक्रेते, शहरात काम काम करणारे यांना या थंडीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.