For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | कोल्हापुरात पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चोरी

01:49 PM Mar 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   कोल्हापुरात पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चोरी
Advertisement

                     कोल्हापुरात महिलांच्या टोळीचा धाडसी प्रकार

Advertisement

कोल्हापूर -जेवण आणि पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून चार ते पाच फिरस्त्या महिलांनी घरातील १ तोळ्याचे दागिने लंपास केले. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पापाची तिकटी येथील लक्ष्मी गल्लीमध्ये ही घटना घडली. याबाबतची फिर्याद लक्ष्मी महादेव कुंभार यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी गुजरी परिसरात चार ते पाच महिलांचे टोळके फिरत होते. दुकानात तसेच घरामध्ये जेवण आणि पाणी मागण्याच्या बहाण्याने टेहाळणी करुनहे टोळके रेकी करत होते. पापाची तिकटी येथील लक्ष्मी गल्लीमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी महादेव कुंभार या पाणी भरत होत्या. त्या एकट्या असल्याचे पाहून यापैकी दोन महिलांनी पाणी व भाकरी मागण्याच्या बहाण्याने लक्ष्मी कुंभार यांना बोलण्यात गुंतवून ठेवलं.

Advertisement

अन्य महिलांनी घरात प्रवेश करून कपाटातील डबे उघडून त्यातील सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. काही वेळातच कुंभार यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीसांनी चोरट्या महिलांचा शोध सुरु केला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Advertisement
Tags :

.