Kolhapur : कोल्हापूरमध्ये भाजी न दिल्याच्या रागातून भाजी विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला
ताराबाई रोडवर भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला
कोल्हापूर : भाजी माल विक्रीसाठी न दिल्याच्या रागातून भाजी विक्रेत्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारी सकाळी ताराबाई रोडवरील कपिलतीर्थ मार्केटच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. या घटनेत संतोष येडगे (रा. बलराम कॉलनी लक्षतीर्थ वसाहत) हे जखमी झाले असून, त्यांनी याबाबतची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. यानुसार नूतन पोवार, ओमकार पोवार, सौरभखबडे याच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष येडगे हे रविवारी सकाळी टेम्पोतून भाजी घेऊन कपिलतीर्थ मार्केटच्या पार्किंगमध्ये भाजी विक्रीस बसले होते. यावेळी नूतन पोवार व अन्य तीन संशयितांनी त्यांच्याकडे विक्रीसाठी भाजीची मागणी केली. मात्र येडगे यांनी भाजी देण्यास नकार दिला. यामुळे वाद झाला.