महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केरळमध्ये राज्यपालांचा ‘एसएफआय’शी पुन्हा संघर्ष

06:09 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काळे झेंडे दाखवल्याने राज्यपालांचे रस्त्यावरच ठाण

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरूअनंतपुरम

Advertisement

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केरळमधील कोल्लम जिह्यात एसएफआय (स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया) विरोधात आंदोलन सुरू केले. शनिवारी सकाळी एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. या घटनेवरून संताप व्यक्त करत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रŽ उपस्थित करत अनेक आरोप केले. या घटनेवरून केरळमध्ये पुन्हा एकदा एसएफआय आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.

कोल्लममध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. राज्यपाल एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोट्टारकारा येथे जात होते. त्यांचा ताफा कोल्लममधील निलामेल येथे पोहोचताच सीपीआयएमची विद्यार्थी संघटना एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. काळे झेंडे पाहून राज्यपाल संतप्त झाले. त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. निषेधामुळे संतप्त झालेल्या राज्यपालांची एसएफआय कार्यकर्त्यांशी शाब्दिक वादावादीही झाली. यानंतर संतापलेल्या राज्यपालांनी घटनास्थळीच ठाण मांडले. सावधगिरीची उपाययोजना म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी पोलीस आंदोलकांना सुरक्षा देत असल्याचा आरोप करत गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान अधिकच संतप्त झाले. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधानांशी बोलण्याची सूचनाही केल्याचे समजते.

डिसेंबर 2023 मध्येही एसएफआयने राज्यपालांविरोधात निदर्शने केली होती. त्यानंतर कालिकत विद्यापीठातील स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याविरोधात पोस्टर फडकावले होते. राज्यपाल दिल्लीला जाण्यासाठी तिऊअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात असताना त्यांच्या वाहनाला एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी धडक दिल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर शारीरिक दुखापत करण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या पोस्टर मोहिमेमागे मुख्यमंत्री आणि राज्य पोलिसांचा हात असल्याचा आरोप राज्यपालांनी केला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article