महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केजरीवालांच्या अनुपस्थितीत ‘आप’ची प्रचारमोहीम सुरू

06:20 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जेल का जवाब वोट से’ नावाची मोहीम

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकीरता स्वत:ची प्रचारमोहीम सुरू केली आहे. ‘जेल का जवाब वोट से’ नावाच्या या मोहिमेंतर्गत आपने अनेक ठिकाणी पोस्टर्स झळकविली आहेत. या पोस्टर्समध्ये अरविंद केजरीवाल हे गजाआड असल्याचे दिसून येते. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. आपने तुरुंगात कैद मुख्यमंत्र्यालाच स्वत:च्या मोहिमेचा हिस्सा केले आहे.

केजरीवालांचे कार्य पुढे नेणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही एक मोहीम सुरू केली असून याचे नाव ‘जेल का जवाब वोट से’ आहे. ज्या दिवशी मतदान होईल, त्यादिवशी तुरुंगासाठीचे प्रत्युत्तर भाजपला मिळणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत प्रत्येक घरात जात आम्ही लोकांशी संवाद साधणार आहोत असे आप नेत्यांनी सांगितले आहे.

अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यास त्यांच्याशिवाय प्रचार कसा होणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. परंतु केजरीवालांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. 25 मे रोजी हे आंदोलन समाप्त होणार असल्याचे आप नेते गोपाल राय यांनी म्हटले आहे.

आतिशी करणार प्रचार

एकीकडे पक्षाने स्वत:ची प्रचारमोहीम सुरू केली आहे. तर दिल्लीच्या मंत्री आणि आप नेत्या आतिशी मार्लेना आसाममध्ये तीन दिवसांपर्यंत प्रचार करणार आहेत. आतिशी या दिब्रूगड, सोनितपूर आणि दुलियाजान लोकसभा मतदारसंघातील आप उमेदवारांसाठी मतयाचना करणार आहेत. या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.

संजय सिंहांकडून भाजप लक्ष्य

भाजप आणि केंद्र सरकारने लाखो-कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. हा भ्रष्टाचार इलेक्टोरल बाँडद्वारे करण्यात आला आहे. नियमांमध्ये बदल करत हजारो कोटी रुपयांची करसवलत देण्यात आली. अनेक कंपन्यांना कंत्राटं देण्यात आली आणि सर्व प्रकार पडद्याआडून सुरू होता. मागील 7 वर्षांमध्ये तोट्यात असलेल्या 33 कंपन्यांनी भाजपला 450 कोटी रुपयांची देणगी दिली असल्याचा दावा संजय सिंह यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article