जपानमध्ये आळसाला मानतात आजार
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात तुम्ही जर एक आळसी व्यक्ती असाल तर खरोखरच तुम्हाला स्वत:वर काम करण्याची गरज आहे. जपानमध्ये आळसाला एक मानसिक आणि शारीरिक आजाराप्रमाणे पाहिले जाते. कुठल्याही सिस्टीमवर काम करत नसेल तर व्यक्ती आळशी होतो असे त्या लोकांचे मानणे आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तेथील लोक काही पद्धतींवर काम करतात. जपानमधील लोक हे कामाबद्दल अत्यंत सजग असतात, चोखपणे काम करणे, दिलेली वेळ पाळणे अन् कामात स्वत:ला बुडवून घेण्यासाठी जपानचे लोक ओळखले जातात. स्वत:ची सक्रीयता कायम ठेवण्यासाठी जपानमधील लोक अनेक मार्ग स्वत:च्या दैनंदिन आयुष्यात अवलंबित असतात. याच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत व्यग्र राहणारा समाजा निर्माण केल्याचे दिसून येते.
आळस दूर करण्यासाठी जपानच्या 8 पद्धती
काइजेन : मोठ्या लक्ष्याऐवजी छोट्या छोट्या सुधारणांनी सुरुवात करा असे ही पद्धत सांगते. यासाठी स्वत:च्या दिवसाची सुरुवात एखाद्या अशा लक्ष्याने करा, जे अत्यंत छोटे असेल, ज्याविषयी मेंदूला फार विचार करावा लागणार नाही.
इकिगाई : या शब्दाचा अर्थ जीवन जगण्याचे कारण आहे. आळस त्यागासाठी काय पेक्षा का वर लक्ष केंद्रीत केले जावे. जेव्हा व्यक्तीला स्वत:च्या जीवनाचा उद्देश स्पष्ट असतो, तेव्हा त्याच्यात काम करण्याची प्रेरणा वाढू शकते.
हारा हाची बू : अधिक खाल्ल्याने एकाग्रता, ऊर्जा आणि मानसिक स्पष्टता कमी होऊ शकते. अनेक जपानी लोक आजही आहार केवळ 80 टक्क्यांपर्यंत पोट भरण्यापुरता घेत असतात. पोट काही प्रमाणात रिकमी असल्यास तुम्ही अधिक सक्रीय आणि ऊर्जावान असू शकता.
एकाग्रतेने काम करा : काही सवयी निर्माण केल्याने अनेक लाभ मिळतात. तुम्हीही काही सवयींना स्वत:साठी निश्चित करू शकात. म्हणजेच 25 मिनिटे काम केल्यावर 5 मिनिटांचा ब्रेक घेणे. कामाच्या सुरुवाती डीप ब्रिदिंगचा सराव करणे. हळूहळू तुमचा मेंदू या सवयींना सरावून जाईल आणि तुम्हाला डीप फोकसमध्ये मदत मिळेल.
स्वत:च्या स्पेसला साफ ठेवा : एका विखुरलेल्या घराचा प्रभाव मानसिक आरोग्यावर पडतो. अस्वच्छतेमुळे तणाव वाढतो आणि एकाग्रता कमी होते, ज्यामुळे उत्पादकता कायम राहण्यास अडचणी येतात.
किंटसुगी : काम टाळण्याच्या सवयीमागे अनेकदा अपयशाची भीती दडलेली असते. तर काम पूर्ण केल्यास गती मिळते. परफेक्शनच्या प्रतीक्षेत अनेकदा आपण ताटकळत राहतो.
वाबी-साबी : या सवयीत सर्वकाही परफेक्ट होण्यापूर्वी कृती केली जाते. कधीच परिपूर्ण स्थितीची प्रतीक्षा करत राहू नका. जे तुमच्याकडे आहे, त्याच्यापासूनच सुरुवात करा.
एक सिस्टीम तयार करा : केवळ प्रेरणेने तुमचे वर्तन बदलू शकत नाही. एका योग्य सिस्टीममुळे दीर्घकाळापर्यंत चालणारी शिस्त तयार होते.