For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडाल्कोच्या व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात

10:01 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडाल्कोच्या व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात
Advertisement

वार्ताहर /काकती

Advertisement

हिंडाल्को कम्युनिटी व्हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हिंडाल्को क्रीडा मैदानावर सोमवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. हिंडाल्को कम्युनिटी विभागात येणाऱ्या यमनापूर, गौंडवाड, बसवनगोळ, काकती, कंग्राळी बुद्रुक, एव्हरग्रीन मीट बॉय, हिंडाल्को वारीअर्स, कणबर्गी आदी आठ टीमचे प्रमुख पुरस्कर्ते यांच्यावतीने क्रीडांगणात खेळाच्या मशाली पेटविण्यात आल्या. तसेच या टीमचे अध्यक्ष व सेक्रेटरींना सेंद्रीय खताचे वितरण करण्यात आले. ओल्या व सुक्या कचऱ्यातून सेंद्रीय खत निर्माण होते. पर्यावरण सुरक्षित राहते यांचे मार्गदर्शन हिंडाल्कोचे जॉन यांनी केले. हिंडाल्को कंपनीचे एच. आर. मॅनेजर मयूर कृष्णा यांनी चेंडू उडवून प्रकाशझोतात उद्घाटन केले. मयूर कृष्णा मार्गदर्शन करताना म्हणाले, व्हॉलीबॉल खेळल्याने खेळाडूंमध्ये संघभावना, सहकार्य, संयम, लवचिकता या गुणांचा विकास होतो. दोन संघामध्ये चेंडूने खेळला जाणारा हा सांघिक खेळ असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन ऑनलाईन व स्पर्धेच्या युगात शारीरीक आरोग्यासाठी खेळाचे महत्त्व पटवून दिले. हिंडाल्कोचे अधिकारी महेश शेट्टी, दिनेश नाईक, नितेश खंडेवाल, भारत शिंगे, संदीप पाटील, अजित भागोजी, प्रदीप त्रिपाठी, आशिष मिश्रा, सुधीर कुट्रे, हिरक मित्रा, मनोजकुमार, भिमू करेन्नवर, टीम सेक्रेटरी भावकाण्णा टुमरी, संजू इनामदार, बसू चिखलदिनी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.