हातखंब्यात भरदिवसा चोरट्यांनी दोन घरे फोडली
रत्नागिरी :
तालुक्यातील हातखंबा कदमवाडी व तारवेवाडी येथे भरदिवसा चोरट्यांनी दोन घरे फोडून 2 लाख 15 हजार ऊपयांचा ऐवज चोऊन नेल़ा ही घटना बुधवारी सकाळी 11.45 ते दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडल़ी संजय शिवराम कदम (41, ऱा हातखंबा कदमवाडी, रत्नागिरी) व रमेश रत्नू तारवे (ऱा हातखंबा तारवेवाडी, रत्नागिरी) अशी घरफोडी झालेल्या घरमालकांची नावे आहेत़ या प्रकरणी अज्ञात चोरट्याविऊद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
संजय कदम यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होत़ी त्यानुसार 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11.45 ते दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास संजय कदम यांच्या घराचा मागील दरवाजा चोरट्यांनी कोणत्या तरी उचकटून आतमध्ये प्रवेश केल़ा तसेच घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आदी ऐवज चोऊन नेल़ा तर हातखंबा तारवेवाडी येथील रमेश तारवे यांच्या घराचा मुख्य दरवाजा चोरट्यांनी उचकटून आतमध्ये प्रवेश केल़ा तसेच घरामधील लोखंडी कपाटातील रोख रक्कम चोऊन नेल़ी
चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये 40 हजार ऊपयांचे कानातील जोड, 25 हजार ऊपये वजनाची सोन्याची चेन, 15 हजार ऊपये किंमतीची अंगठी व 1 लाख 35 हजार ऊपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोऊन नेली, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आल़ी पोलिसानी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविऊद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 305, 331(3) नुसार गुन्हा दाखल केल़ा