महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धारबांदोड्यात ब्लॅक पॅन्थरच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला

12:28 PM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ब्लॅक पॅन्थरसाठी पिंजरा कायम ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी

Advertisement

धारबांदोडा : वंडाळा-धारबांदोडा येथे वन विभागाने ब्लॅक पॅन्थर पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली आहे. ही मादी अंदाजे अडीच वर्षाची आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील वंडाळा, शिवडे या परिसरात ब्लॅक पॅन्थरचा संचार असून त्याने अनेक पाळीव प्राण्dयांचा फडशा पाडल्याचा स्थानिकांच्या तक्रारी होत्या. याची दखल घेऊन वन विभगाचे वंडाळा येथे पिंजरा लावला होता. त्याच पॅन्थर ऐवजी बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या उशिरापर्यत मोले येथे ठेवण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर पुढील निर्णय योग्य तो निर्णय घेतला जाईल असे कुळे क्षेत्रीय वनधिकारी रवी शिरोडकर यांनी माहिती दिली. वंडाळा येथील ग्रामस्थांनी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article