इंग्रजी विज्ञानचा अभ्यास करण्या सखोल, प्रवेशासाठी झुकला विद्यार्थ्यांचाकल
80 टक्के विद्यार्थ्यांचा विज्ञानकडे कल
-अकरावी विज्ञान शाखेसाठी 6 हजार 252 विद्यार्थी प्रवेशोइच्छूक
विज्ञान शाखेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा 292 जादा अर्ज दाखल
वाणिज्य शाखेच्या मात्र 75 जागा रिक्त
गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञानसाठी 2 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज वाढले
यंदाचा कट ऑफही वाढला
► इम्रान गवंडी
कोल्हापूर
अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेच्या पहिल्या फेरीची आकडेवारी शुक्रवारी प्रवेश समितीकडून जाहीर करण्यात आली. यंदा पहिल्या फेरीतच 80 टक्के विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेच्या इंग्रजी माध्यमकडे कल असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकरावी विज्ञान इंग्रजी माध्यमसाठी 5 हजार 960 जागा उपलब्ध असताना एकूण 6 हजार 252 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. एकूण प्रवेश क्षमतेपेक्षा 292 जादा विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांची अधिक पसंती असल्याचे दिसुन येते.
यंदा अकरावीच्या विज्ञान व वाणिज्य शाखा इंग्रजी माध्यमसाठी ऑनलाइन प्रवेशाकरिता एकूण 7 हजार 357 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये विज्ञान इंग्रजी शाखेसाठी 6 हजार 252 तर वाणिज्य इंग्रजी शाखेसाठी 1 हजार 105 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. वाणिज्य शाखा इंग्रजी माध्यमची 1280 प्रवेश क्षमता आहे. वाणिज्यसाठी 1105 विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या अजुनही 75 जागा रिक्त आहेत. दरवर्षी अकरावीसाठी नव्या
शाखेला पसंती दिली जात आहे.
गतवर्षी विज्ञान शाखेसाठी उपलब्ध जागेपेक्षा विद्यार्थ्यांनी कमी अर्ज दाखल केल्याने तब्बल 1 हजार 760 जागा शिल्लक राहिल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेसाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थाच्या संख्येत 2 हजार 132 ने भर पडली आहे. यंदा पहिल्या फेरीतच प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत इच्छूक विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरू होण्याआधीच तब्बल 122 जागा कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.
टॉपर विद्यार्थ्यांचीही विज्ञानलाच पसंती
यंदा 95 ते 100 टक्के गुण मिळालेल्या 19 विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला पसंती दिली आहे. तर विज्ञान शाखेसाठी 95 ते 100 टक्के गुण मिळवलेल्या तब्बल 160 विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे टॉपर विद्यार्थ्यांनीही विज्ञान शाखेसाठी 80 टक्के अधिक पसंती दिली आहे.
----------------------------,!0
गतवर्षी प्रवेश घेतलेले विद्यार्थी
शाखा प्रवेश क्षमता प्रवेश निश्चिती शिल्लक जागा
विज्ञान : 5880 4120 1760
वाणिज्य : 1600 915 685
एकूण : 7480 5035 2445
----------------------------
यंदा प्रवेशोच्छूक विद्यार्थी
शाखा प्रवेश क्षमता प्राप्त अर्ज फरक
विज्ञान इंग्रजी माध्यम : 5960 6252 292 जादा अर्ज
वाणिज्य इंग्रजी माध्यम : 1280 1105 75 जागा रिक्त
एकूण : 7240 7357 ----
----------------------------
टक्केवारीनुसार पसंती दिलेले विद्यार्थी
विज्ञान शाखा :
टक्केवारी विद्यार्थी संख्या
95 ते 100 टक्के 160
90 ते 95 टक्के 797
85 ते 90 टक्के 1030
80 ते 85 टक्के 1212
वाणिज्य शाखा :
टक्केवारी विद्यार्थी संख्या
95 ते 100 टक्के : 19
90 ते 95 टक्के : 97
85 ते 90 टक्के : 135
80 ते 85 टक्के : 147
----------------------------
यंदा विज्ञान शाखेकडे अधिक कल
गतवर्षीच्या तुलनेत यंदा अकरावी प्रवेशाचा कट ऑफ दोन टक्क्यांनी वाढला आहे. प्रवेश प्रक्रीयेच्या पहिल्या फेरीत विज्ञान शाखेच्या इंग्रजी माध्यमसाठी 3 हजार 844 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. यंदा विज्ञान शाखेकेडे विद्यार्थ्यांची अधिक ओढ आहे. प्रवेश निश्चितीसाठी संबंधित महाविद्यालयात प्रकीया सुरू आहे.
स्मिता गौड, सहायक शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक कार्यालय